मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने
शनिवार, १४ जून, २०२५
पोलीस स्टेशन रावणवाडी पोलिसांची उत्कृष्ट कारवाई.... एकास अग्निशस्त्रसह घेतले ताब्यात... गुन्हा नोंद
गोंदिया : दिनांक १४/०६/२०२५ चे १२/४८ वा. पोलीस स्टेशन रावणवाडी येथील अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय बातमी दाराकडुन खात्रीशिर बातमी मिळाली की, मौजा मंगरुटोला (लंबाटोला) ते पांजरा गावाकडे जाणा-या कच्चा रसत्यावर एक इसम हा स्वत: जवळ पांढ-या पिशवित गावठी कट्टा बाळगुन फिरत आहे. अशा मुखबीर च्या खबरे वरुन मंगरुटोला शिवारातुन मंगरुटोला ते पांजरा जाणा-या कच्चा रोडयावर पोलीस स्टेशन रावणवाडी येथील अधिकारी व अंमलदार गेले असता सदर ठिकाणी एक ईसम पांढ-या रंगाची पिशवी घेवून फिरतानी मिळुन आला त्यास ताब्यात घेऊन थांबवुन त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव राजु हिरालाल मेश्राम वय ४२ रा. मंगरुटोला (लंबाटोला) ता.जि. गोंदिया असे सांगीतले. त्याची पंचासमक्ष झळती घेण्यात आली असता राजु हिरालाल मेश्राम याचे ताब्यात असलेल्या पांढ-या रंगाचा पिश्वीत एक लोखंडी थातुची पिस्तुल सारखा दिसणारा एक गावठी कट्टा, (अग्नीशस्त्र) ज्याला एक लोखंडी मुठ असुन समोर लोखंडी बॅरल (नली) असुन लोखंडी बॉडी असलेला ज्याला दोन ट्रिगर अंदाजे किमती १५०००/ रु. चा माल मिळुन आला. त्यास सदर गावठी कट्टा कुठुन आणले याबाबत विचारणा केली असता त्याने कोणतेही समाधानकार उत्तर दिलेले नाही. पंचासमक्ष आरोपीच्या ताब्यातुन एक लोखंडी गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) अंदाजे किमती 15000/-रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचे विरुद्ध पो ठाणे रावणवाडी अप क्रमांक 282/2025 भारतीय हत्यार कायदा चे कलम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई तपास प्रक्रिया सपोनि नावकार हे करीत आहेत.
सालेकसा:पिपरिया ग्राम पंचायत कार्यालय के सामने 20 जून को पत्रकार मानकर का अन्न त्याग हड़ताल
पिपरिया ग्राम पंचायत कार्यालय के सामने 20 जून को पत्रकार मानकर का अन्न त्याग हड़ताल
🖋️ तामेश्वर पंधरे मुख्यसंपादक
सालेकसा: से 15 किलोमीटर पिपरिया ग्राम पंचायत अंतर्गत गल्लाटोला निवासी दिनेश मानकर ( पत्रकार )एवं सालेकसा तालुका पत्रकार संगठन के तालुका अध्यक्ष द्वारा अवैध अतिक्रमण को लेकर पिपरिया ग्राम पंचायत के समक्ष अन्य त्याग आंदोलन व आत्मदाह करने की चेतावनी दी गई है।
ज्ञात हो की पत्रकार दिनेश मानकर ने शासकीय जमीन पर अपने घर के सामने लगभग २० से २५ से सालों से उसका कब्जा था। जहां पर ५० से ६० ट्रैक्टर मुरम डालकर उसे जगह में बैठने उठने या अपना ट्रैक्टर रखने का काम किया करता था।जहां पर नवागढ़ से आया हुआ प्रदीप सहेज लाल कोरोटे, योगराज सहेज लाल कोरोटे ने उसके कब्जे पर अवैध कब्जा कर जबरन अतिक्रमण किया इतना ही नहीं पत्रकार दिनेश मांनकर एंव उसके परिवार को जान से मारने की धमकी तक देने से बाज नहीं आया जिसकी शिकायत २८ /२/ २०२५ को सालेकसा पुलिस मैं दर्ज कराई गई है जहां चौकसी के नाम पर आंसू पूछने का गोरख धंधा बीट जमादार द्वारा किया गया है और बीट जमादार द्वारा पूरे गांव के आकर को उसके बाप दादा की जमीन बताया गया है.।यह एक पुलिस विभाग का अंधा कानून है आरोपी को सलाह दी जाती है और फिर्यादी को पटाकर किया जाता है।
आरोपी यहां तक ही नहीं रुके अपने पिता के नाम की जमीन अपने नाम पर प्रमाणित मकान बनाने के लिए लेकिन अपने पिता के जमीन पर मकान न बनाकर उसने सरकारी जमीन पर मकान बनाया है और हलफनामा तैयार कर लिया है जबकि गट क्रमांक २७५ उसके पिता के नाम पर है वहां पर मकान न बनाकर गट क्रमांक २७४ में मकान बनाया है,जो की शासकीय जमीन है जिसे गांव के आकार के नाम से मुकर्रर किया गया है मंडई मेला और छोटे-मोटे कार्यक्रम किए जाते हैं शादी विवाह जैसे यह बाहर गांव से आकर इस गांव में अवैध अतिक्रमण कर रहा है।वही गांव वाले को धमकी देने से बाज नहीं आ रहा है गैर अर्जदार अवैध धंधे बाज होने के कारण उनके हौसले दिनों दिन बुलंद होते जा रहे. हैं.। फर्जी एप्टीट्यूड तैयार कर ग्राम पंचायत को सौंप दी गई है और घर टैक्स पावती प्राप्त कर लिया गया।् जिसकी घर टैक्स पावती अभिलंब रद्द की जाए। वही ग्राम पंचायत अधिकारी कर्मचारी पदाधिकारी वार्ड मेंबर, हाथ पर हाथ धर कर बैठे हुए हैं। गैर अर्जदारो ने पत्रकार को जान से वह उसके परिवार को भी देख लेने की धमकी दी गई है जिससे पूरा परिवार दहशत में है इतना ही नहीं उसे झूठे मामले में फसाने की भी धमकी दी गई है, स्थानिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ता सालेकसा तालुका पत्रकार संगठन के तालुका अध्यक्ष दिनेश मानकर ने इस मामले की उच्च स्तरीय जांच हेतु।
जिलाधिकारी साहेब गोंदिया, मुख्य कार्यपालन अधिकारी साहेब जिला परिषद कार्यालय गोंदिया माननीय पुलिस अधीक्षक साहेब गोंदिया माननीय तहसीलदार साहब तहसील कार्यालय सालेकसा माननीय खंड विकास अधिकारी सहायक पंचायत समिति सालेकसा माननीय उपग्रह पुलिस अधिकारी साहेब आमगांव माननीय पुलिस निरीक्षक साहेब साल का माननीय ग्राम विकास अधिकारी साहेब ग्राम पंचायत कार्यालय पिपरिया माननीय सरपंच साहब ग्राम पंचायत कार्यालय पिपरिया माननीय अध्यक्ष साहब तंटा मुक्ति समिति पिपरिया माननीय सचिव साहब तंटामुक्ति समिति पिपरिया स्थानिक आमदार संजय पुराम तथा गडचिरोली लोकसभा क्षेत्र के खासदार डॉक्टर नामदेवराव किरसान को भी इसकी जानकारी दी गई है शासन प्रशासन से मांग है कि कथित गैर अजय द्वारा किया गया अतिक्रमण तत्काल हटाए जाए और उसका घर टैक्स अविलंब रद्द किया जाए और उसके बाद कानूनी कार्रवाई की जाए और कार्य किसी भी प्रकार के कार्रवाई नहीं होने पर 20 जून को ग्राम पंचायत कार्यालय के समक्ष पत्रकार द्वारा भूख हड़ताल कर आत्मदाह करने की चेतावनी दी गई है। अब देखना यह है कि पत्रकार दिनेश मानकर को शासन प्रशासन की तरफ न्याय मिलेगा क्या जनता की नजर।
बुधवार, ११ जून, २०२५
पक्षीप्रेमी दिलीप कोकाटे यांनी दिले कबुतराला जीवदान,वडाला बांधलेल्या धाग्यात अडकला पाया
पक्षीप्रेमी दिलीप कोकाटे यांनी दिले कबुतराला जीवदान
वडाला बांधलेल्या धाग्यात अडकला पाया
पनवेल/ प्रतिनिधी
वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडाला बांधलेल्या धाग्यात एका कबुतराचा पाय अडकून तो हालहाल करत होता. ही दुर्दशा पक्षीप्रेमी दिलीप कोकाटे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तिथे असलेल्या पुष्पा आवटे यांना सोबत घेऊन धागा सोडवला आणि त्या कबुतराला जीवदान दिले.
दिलीप कोकाटे यांनी संयम, काळजी आणि माया दाखवत कबुतराला सुरक्षितरीत्या मुक्त केले. नागरिकांनी त्यांच्या या कृत्याचे कौतुक केले असून, धार्मिक कार्य करताना निसर्ग आणि प्राणिमात्रांची काळजी घेण्याचे महत्त्वही या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
शुक्रवार, ६ जून, २०२५
आधुनिकतेकडे एक पाऊल : आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने 1 कोटी 70 लाखांच्या निधीतून जयस्तंभ चौक बस स्थानकाचा होणार आधुनिक सुशोभीकरण
आधुनिकतेकडे एक पाऊल : आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने 1 कोटी 70 लाखांच्या निधीतून जयस्तंभ चौक बस स्थानकाचा होणार आधुनिक सुशोभीकरण
शहरवासीयांच्या वर्षानुवर्षांच्या मागणीला मिळणार न्याय, सर्व सुविधा असलेले बस स्थानक लवकरच साकार होणार
गोंदिया:शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जयस्तंभ चौकातील बस स्थानक अनेक वर्षांपासून अराजकतेला, अव्यवस्थेला आणि दुर्लक्षाला सामोरे जात होते. येथील जुने बस स्थानक जीर्ण अवस्थेला पोहोचले होते, जेथे दिवसातून अनेक वेळा भटक्या जनावरांचा विळखा आणि सभोवताली पसरणारी अस्वच्छता नागरिकांच्या सहनशक्तीची कसोटी घेत होती. अनेक वर्षांपासून शहरवासीयांची मागणी होती की या अत्यंत गजबजलेल्या चौकात एक आधुनिक आणि सर्व सुविधायुक्त बस स्थानक उभारले जावे.आता या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलले जात असून, आमदार विनोद अग्रवाल यांच्या अथक प्रयत्नांमुळे 1 कोटी 70 लाख रुपयांच्या निधीतून जयस्तंभ चौक बस स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. ही केवळ पायाभूत सुविधा प्रकल्प नसून, शहराच्या जीवनमानाला नवे परिमाण देणारे परिवर्तन ठरणार आहे.
नवीन बस स्थानक कसे असेल
नवीन बस स्थानक अत्याधुनिक वास्तुविशारद संकल्पनेसह आणि सर्व नागरी सुविधा असलेल्या स्वरूपात बांधले जाईल. त्यामध्ये यांचा समावेश असेलः
✅ स्वच्छ व सुंदर प्रतीक्षालय
✅ महिलांसाठी, पुरुषांसाठी व दिव्यांगासाठी स्वतंत्र स्वच्छ व सुसज्ज शौचालय
✅ शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा
✅ डिजिटल माहिती फलक
✅ प्रकाश व्यवस्था आणि हरित सौंदर्यीकरण
✅ CCTV निगराणी व सुरक्षा यंत्रणा
आमदार विनोद अग्रवाल यांची प्रतिक्रिया:
हे केवळ एक बस स्थानक नाही, तर गोंदिया शहराच्या शिस्त व अभिमानाचे प्रतीक ठरणार आहे. जनतेला अनेक वर्षांपासून जे त्रास सहन करावे लागत होते, त्या वेदनेचा आता शेवट होणार आहे. आम्ही या परिसराला स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट बनवणार आहोत.
विनोद अग्रवाल , आमदार गोंदिया
पूर्वीची स्थिती काय होती?
जयस्तंभ चौक येथील बस स्थानक अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत होते. परिसरात चारही बाजूंनी घाण पसरलेली होती. भटक्या जनावरांचा मुक्त संचार चालू होता. प्रवाशांना बसण्यासाठी किंवा थांबण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. अती व्यस्त वाहतुकीच्या चौकात रस्त्यावरच थांबावे लागत होते, ज्यामुळे अनेकदा अपघातही होत असत. महिलांसाठी आणि अन्य प्रवाशांसाठी शौचालय, पिण्याचे पाणी अशा मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नव्हत्या.सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, हा संपूर्ण परिसर राष्ट्रीय महामार्ग व बाजारपेठेच्या जवळ असल्यामुळे येथे प्रचंड गर्दी आणि वाहतुकीची अराजकता होती.
या सर्व समस्यांचा गांभीर्याने विचार करून आमदार विनोद अग्रवाल यांनी या प्रकल्पाला केवळ मंजुरी मिळवून दिली नाही, तर तातडीने प्रशासकीय मान्यता मिळवून हे काम प्राधान्य यादीत समाविष्ट करून घेतले.
शहरवासीयां मध्ये आनंदाचे वातावरण
शहरातील नागरिक, व्यापारी, वाहनचालक व प्रवासी यांच्यात या निर्णयामुळे आनंदाची लाट उसळली आहे. त्यांनी याला “विकासाच्या दिशेने क्रांतिकारी पाऊल” असे संबोधले आहे.हे केवळ बस स्थानक नाही, तर आमच्या शहराच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे." — एक व्यापारी
"वर्षानुवर्षांची वाट पाहणे संपले. आमदार साहेबांचे मनःपूर्वक आभार!" — एक महिला प्रवासी
निष्कर्ष
गोंदियातील जयस्तंभ चौक बस स्थानक आता केवळ एक बस थांबा न राहता, एका स्मार्ट व सुशोभीत शहराचे प्रवेशद्वार ठरणार आहे. हा प्रकल्प केवळ पायाभूत सुविधा नाही, तर जनतेच्या सेवेची खरी ओळख आहे.
📌 पूर्ण कामासाठी नियोजित कालावधी: पुढील ६ महिने
📌 प्रारंभ दिनांक: लवकरच भूमिपूजन करून बांधकामास प्रारंभ होणार
"जनतेच्या विश्वासातून प्रेरित, जनहितासाठी समर्पित"
पोलीस मुख्यालय गोंदिया, (कारंजा) येथे समर कॅम्प-२०२५ चे समारोपीय कार्यक्रम संपन्न
पोलीस मुख्यालय गोंदिया, (कारंजा) येथे समर कॅम्प-२०२५ चे समारोपीय कार्यक्रम संपन्न
🖊️ मनोज भालेकर प्रतिनिधी
गोंदिया :०५ जून २०२५ रोजी "प्रेरणा सभागृह", पोलीस मुख्यालय गोंदिया येथे प्रमुख अतिथी मा. श्रीमती रोशनी भामरे, मॅडम यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलित करुन समर कॅम्प २०२५ चे समारोप समारंभ कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक तथा अति. कार्य. पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) श्रीमती नंदिनी चानपुरकर यांच्या हस्ते प्रमुख अतिथी यांना भेटवस्तु व पुष्पगुच्छ देवुन त्यांचे स्वागत करण्यात आले. गोंदिया जिल्हा पोलीस विभागातर्फे पोलीस अधिकारी/अंमलदार/मंत्रालयीन स्टाफ यांच्या पाल्यांकरिता दिनांक ०७/०५/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत समर कॅम्प मध्ये फुटबॉल, चेस, व्हॉलीबॉल, स्पोकन इंग्लिश व डॉन्स प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले होते.
०१ महिना चालणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व मुले - मुलींना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्रीमती रोशनी भामरे, मॅडम यांच्या शुभहस्ते स्मृती चिन्हे व प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करुन गोंदिया जिल्हा पोलीस विभागामार्फत पोलीस पाल्यांचे खेळातील कौशल्य व नैपुण्य वृध्दींगत करण्यासाठी तसेच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ गुणांना वाव मिळावा व त्यांच्यामध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी या संकल्पनेतुन पोलीस पाल्यांना त्यांच्या पुढील वाटचाली करिता भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
गोंदिया जिल्हा पोलीस विभागातील फुटबॉल कोच अकिल कुरैशी, व्हॉलीबॉल कोच दुर्योधन हनवते, चेस (बुध्दीबळ) कोच श्री डिगेश्वर चौरे व प्रभाकर पालांदुरकर, स्पोकन इंग्लिश प्रशिक्षक श्री किशोर कटरे व साई ग्रुप गोंदिया येथील डॉन्स प्रशिक्षक निखलेश शेंद्रे व सुरु सेंद्रे यांच्याकडुन पोलीस पाल्यांना अतलुनीय असे उत्कृष्ठपणे प्रशिक्षण देण्यात आले. सदर कार्यक्रमात पोलीस निरीक्षक श्रीमती नंदिनी चानपुरकर, राखीव पोलीस निरीक्षक श्री रमेश चाकाटे, त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हयातील पोलीस अंमलदार तसेच त्यांचे कुटुंबीय व पाल्य हे मोठया संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन मपोहवा मंगला प्रधान व आभार प्रदर्शन पो.नि. नंदिनी चानपुरकर, यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता पोनि नंदिनी चानपुरकर,रापोनि रमेश चाकाटे, गेम इंजार्च दिपक दत्ता, श्रेणी पोउप- निरीक्षक रोशन उईके, सफौ मुस्तफा सरवर, पोहवा पंकज पांडे, चंद्रकांत बरकुंड, मपोहवा तारीका भोयर, पोहवा राजु डोंगरे व राज वैद्य तसेच पोलीस मुख्यालय गोंदिया येथील डी. आय. स्टाफ यांनी अथक परिश्रम मेहनत घेतली .
रविवार, १ जून, २०२५
गजेंद्र चंदनसिंग बसिने कृषी क्षेत्रात इंडियन एक्सेलंन्स अवॉर्ड ने सन्मानित
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मलकापूर येथे इंडियन एक्सलन्स अवॉर्ड संपन्न
महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला.
🖊️ तामेश्वर पंधरे मुख्यसंपादक
गोंदिया: दैनिक अहिल्याराज व हिंदी मराठी पत्रकार संघ पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती व दैनिक अहिल्या राज वर्धापन दिवस निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन एक्सएलन्स अवार्ड 2025 चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवण्यात आले होते
त्यावेळी 700 प्रस्तावांपैकी निवड करून 260 मान्यवरांना इंडियन एक्सलन्स पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला.
इंडियन एक्सलन्स अवार्ड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजूभाऊ काजळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर हे होते कार्यक्रमाचे उद्घाटक धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ हे होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून निलेश तायडे सहा माहिती आयुक्त मंत्रालय मुंबई, संदीप काळे ठाणेदार मलकापूर ग्रामीण, भाई अशांत वानखेडे संस्थापक समतेचे निळे वादळ, प्रसादभाऊ जाधव राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब दामोदर उद्योजक, प्रा. डॉ. अनिल खर्चे सर प्राचार्य इंजिनिअरिंग व्ही. भी. कोलते इंजीनियरिंग कॉलेज, फारुख शेख ज्येष्ठ पत्रकार लोकमत, पत्रकार होते.
कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक ,राजकीय ,कला, वैद्यकीय, वकील, कृषी , उद्योजक अशा अनेक क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सत्कार इंडियन एक्सएलन्स अवार्ड 2025 देऊन करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील गजेंद्र चंदनसिंग बसिने यांनी महाराष्ट्रात कृषि क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी सामाजिक क्षेत्रातील कार्यक्रमात सहभागी होउन ,शेती विषयी माहिती देणे उदा.बियाणे कोणते वापरावे,खते केव्हा वापरायचे,औषधी कोणती वापरायचे यांची माहिती देणे ,राजकीय विषयावर चर्चा करणे,कृषी क्षेत्रातील समस्याच्या विचारांची देवाणघेवाण करून,
पीकावर असणारे रोग,पिकाविषयी असणारी समस्यावर चर्चा करुण तोडगा काढणे व रोगावर कोणते किटकनाशके फवारा करायचा ते सांगणे.अशा अनेक समस्या वर चर्चा करून उपाय योजना करून शेतकऱ्यांना जैविक शेती कडे वळवून शेतकऱ्यांची शेती नापीक होण्यापासून बचाव केले याबद्दल कृषि क्षेत्रात इंडियन एक्सेलंन्स अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
यावेळी देशासाठी आपल्या प्राणाची परवा न करता देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
शनिवार, ३१ मे, २०२५
पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे नियत वयोमानाने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे निरोप सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न
पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे नियत वयोमानाने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे निरोप सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न.
🖊️ मनोज भालेकर प्रतिनिधी
गोंदिया:31 मे 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये माहे-मे/2025 मध्ये गोंदिया जिल्हयाचे आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले
1) श्रेणी पोलीस उप-निरीक्षक श्री. गोपाल धाडु कापगते,
2) श्रेणी पोलीस उप-निरीक्षक श्री. विनायक कोलुजी पुडो, तसेच
3) पोलीस अंमलदार श्री. आंनदराव चेपाजी करमरकर
यांचे निरोप सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते....सदर निरोप सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी पोलीस अधीक्षक गोंदिया मा.श्री. गोरख भामरे, यांचे शुभ हस्ते सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी- अंमलदार यांना शाल, श्रीफळ, झाडाची रोपटे, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतीचिन्ह, भेटवस्तु देवुन त्यांचे सत्कार करण्यात आले.... असुन त्यांच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीस शुभेछ्या देण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, तसेच प्रभारी पोलीस उप-अधिक्षक (गृह) श्रीमती नंदिनी चानपुरकर, तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रभारी पोलीस उप-अधिक्षक (गृह) श्रीमती नंदिनी चानपुरकर, यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता कल्याण शाखा येथील, श्री. नंदिनी चानपुरकर, पोहवा राजु डोंगरे, राज वैद्य, यांनी कार्यवाही पार पाडली.
बुधवार, २८ मे, २०२५
इंडियन एक्सलन्स" साठी तामेश्वर पंधरे गजेंद्र बसिने व सचिन बन्सोड यांची निवड
इंडियन एक्सलन्स" साठी तामेश्वर पंधरे,गजेंद्र बसिने व सचिन बन्सोड यांची निवड
> तामेश्वर पंधरे
गोंदिया: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५ साठी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील तामेश्वर पंधरे, गजेंद्र बसिने व सचिन बन्सोड (गोंदिया)यांची निवड झाली आहे. सदैव तत्पर असणारे युवा पत्रकार तामेश्वर पंधरे गोर गरीबांच्या व शेतकरी मजुर वर्गातील व्यक्तिना मदत करणारे व युवा आवाज लाईव्ह न्युज चॅनल /पोर्टल चे मुख्यसंपादक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना हा अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे. सचिन बन्सोड पत्रकार गोंदिया द इंडिया न्युज, महाराष्ट्र लाईव्ह न्युज पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी, गजेंद्र बसिने जैविक शेती, जहर मुक्त शेती अभियान राबवून लोकांचे आरोग्य सुदृढ करून शेतकऱ्याची शेती नापीक होण्यापासून बचाव केले. त्याकरिता १ जून २०२५ रोजी मलकापूर (बुलडाणा) येथे होणाऱ्या कार्यक्रमात तामेश्वर पंधरे, गजेंद्र बसिने व सचिन बन्सोड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार
मंगळवार, २७ मे, २०२५
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर की 300वी जयंतीनिमित्त काटी ग्रामीण मंडल, गोंदिया द्वारा शंखनाद और महाआरती का कार्यक्रम संपन्न
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर की 300वी जयंतीनिमित्त काटी ग्रामीण मंडल, गोंदिया द्वारा नागरा शिव मंदिर में दिनांक 26/05/2025 को शंखनाद और महाआरती का कार्यक्रम संपन्न
गोंदिया: महान शिवभक्त माता अहिल्याबाई होळकर के इस देश में मंदिरों के लिए किए गए कार्यों से प्रेरित होकर आने वाले कुछ दिनों में मंदिरों में स्वछता अभियान भी चलाया जाएगा।आज सैकड़ों की तादाद में कार्यकर्ता और भक्तों ने महाआरती में भाग लिया। सभी का आभार। कार्यक्रम में प्रमुख रूप से उपस्थिति रही श्रीमती सविता ताई विनोद अग्रवाल, पंचायत समिति सभापति श्री मुनेश जी राहंगडाले, एपीएमसी सभापति श्री भाऊराव जी ऊके, श्री छत्रपाल जी तुरकर, श्री गजेंद्र जी फूनडे, श्री सुनील जी केलनका, जिला परिषद सदस्य आनन्द ताई वाडीवा, पंचायत समिति सदस्य जितेश्वरी ताई राहंगडाले, श्री जमाइवार जी,श्री छगन भाऊ माने जी, काटी मंडल अध्यक्ष संदीप जी तुरकर, मंडल अध्यक्ष मुकेश जी लीलहारे, मंडल अध्यक्ष ऋषि साहू जी, श्रीमति कौशल छत्रपाल तुरकर भाभीजी,श्री सुरेश जी लीलहारे,श्री विक्की जी बघेले, श्री महेश जी राहंगडाले, और समस्त कार्यकर्ता गण उपस्थित थे।
शुक्रवार, २३ मे, २०२५
आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने २३ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारला जाणार ५० खाटांचे अत्याधुनिक क्रिटिकल केअर हॉस्पिटल*
PM-ABHIM योजनेअंतर्गत सुरु झालेला महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प, गोंदिया जिल्ह्याच्या नागरिकांसाठी ठरणार संजीवनी
गोंदिया:- जिल्ह्यात आज ५० खाटांच्या क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉकच्या भूमिपूजन समारंभाने एका नव्या युगाची सुरुवात झाली. हा रुग्णालय ब्लॉक भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना (PM-ABHIM) अंतर्गत उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी २३ कोटी ७५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त निधी मंजूर करण्यात आली आहे. या समारंभात गोंदियाचे लोकप्रिय आमदार श्री विनोद अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जनप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक केवळ गोंदिया जिल्ह्यासाठीच नव्हे, तर परिसरातील ग्रामीण भागासाठीही एक वरदान ठरेल. आरोग्यसेवांमध्ये हा एक ऐतिहासिक टप्पा असून आपत्कालीन आणि गंभीर उपचार सेवांना नवे आयाम मिळणार आहेत.
योजनेचे मुख्य उद्दिष्ट:
1. आरोग्य व्यवस्था बळकट करणे – जिल्हा स्तरावर हॉस्पिटलची क्षमता वाढवून रुग्णांना वेळेवर उपचार मिळणार.
2. साथीच्या रोग व आपत्ती व्यवस्थापन क्षमता मजबूत करणे– कोविडसारख्या संकटांना तोंड देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे.
3. गंभीर वैद्यकीय सेवा सुलभ करणे– गंभीर रुग्णांना नागपूर किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये पाठवण्याची गरज नाही.
4. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा सक्षम करणे – प्राथमिक व उपकेंद्रांना आधुनिक उपकरणांशी जोडणे.
*आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकारामुळे मिळाली गती*
गोंदियाचे आमदार श्री विनोद अग्रवाल यांच्या दूरदृष्टी, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रशासकीय समन्वयामुळे हा महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे. त्यांनी सांगितले:
> “माझी प्राथमिकता नेहमी गोंदियाच्या जनतेच्या आरोग्य व कल्याणाशी संबंधित राहिली आहे. हे हॉस्पिटल केवळ उपचाराचे केंद्र न राहता, विश्वास व दिलासा याचे प्रतीक ठरेल.”
भूमिपूजन समारंभ पारंपरिक पूजा विधीनुसार संपन्न झाला. कार्यक्रमात वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर, अधिकारी, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, सरपंच बालकृष्ण बिसेन, दीपा चंद्रिकापुरे (कृषी व पशुसंवर्धन सभापती, जि.प.), राहुल मेश्राम (पंचायत समिती सदस्य, कुडवा), कमल फरदे (उपसरपंच) व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार अग्रवाल यांनी आपल्या भाषणात या हॉस्पिटलला गोंदियाचा *"आरोग्य सुरक्षा किल्ला"* असे संबोधले.
PM-ABHIM योजना: देशभरात आरोग्य सेवा नव्याने घडविण्याची दिशा
हा प्रकल्प राष्ट्रीय आरोग्य अभियानाला (NHM) बळकट करत भारताला भविष्यातील आरोग्य आपत्तींना तोंड देण्यासाठी सक्षम बनवतो. देशभरात क्रिटिकल केअर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात ही योजना एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
*निष्कर्ष: आरोग्य सेवा क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल*
गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना आता उपचारांसाठी मैलोनमैल जाण्याची गरज उरणार नाही. हे ५० खाटांचे क्रिटिकल केअर हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रातील एक नवी क्रांती ठरेल.
बुधवार, २१ मे, २०२५
22 मे रोजी आमगाव स्थानकाचे उद्घाटन होणार, पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करतील उद्घाटन
22 मे रोजी आमगाव स्थानकाचे उद्घाटन होणार, पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करतील उद्घाटन
गोंदिया, दि.21 : रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी भारत सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत, देशभरातील 103 स्थानकांचे उद्घाटन 22 मे रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले जाईल. या प्रसंगी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या 5 स्थानकांचे उद्घाटन - सिवनी, डोंगरगड, इतवारी, चांदा फोर्ट आणि आमगाव यांचाही प्रस्ताव आहे.
आमगाव हे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील एक शहर आहे. जे विदर्भ प्रदेशात आहे. हे स्टेशन गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून 24 किलोमीटर पूर्वेस आहे आणि स्थानिक आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत आमगाव रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 7.17 कोटींच्या मंजूर बजेटसह आमगाव रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण आणि नवीन रूप देण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट हे स्थानक प्रवासी-अनुकूल केंद्र म्हणून विकसित करणे आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांसाठी सुविधा वाढतील. प्रवाशांच्या सोयीसाठी, स्थानकाच्या परिसरात विशेष तिकीट काउंटर, सुसज्ज आधुनिक प्रतीक्षालय, अपंगांसाठी समर्पित सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि स्थानिक कला आणि संस्कृती लक्षात घेऊन स्थानकाची रचना आणि देखावा सुधारण्यात आला आहे. पार्किंगच्या गोंधळासारख्या समस्यांनी त्रस्त असलेले हे स्टेशन आता चांगले प्रवेश-निर्गमन दरवाजे, रुंद रस्ते, दुचाकी पार्किंग आणि वाहतूक नियंत्रण प्रणालीने सुसज्ज आहे. स्टेशन परिसराला हिरवळ आणि सुशोभीकरणाने आकर्षक स्वरूप देण्यात आले आहे आणि स्टेशनला स्थानिक संस्कृती आणि समृद्ध वारशाचे आकर्षक केंद्र बनवण्यात आले आहे, जिथे प्रवाशांची संख्या वाढण्याबरोबरच रोजगार वाढण्याची मोठी शक्यता आहे ज्याचा फायदा स्थानिक लोकांना होईल.
प्रवाशांच्या मागण्या आणि आकांक्षा लक्षात घेऊन, भारतीय रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. आग्नेय मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि विकासासाठी वचनबद्ध आहे, ज्याचे एक महत्त्वाचे प्रतीक म्हणजे स्थानकांचे पुनर्विकासाचे काम.
अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द
धानाच्या बोनस आणि चुकार्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल
धानाच्या बोनस आणि चुकार्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...
-
आमगाव पोलिसांचे शानदार यश - बेकायदेशीरपणे दारू तस्करी करताना ३५ पेट्या आणि वाहन जप्त! शहरातील जगनाडे चौकात कारवाई 🖋️ मनोज भालेकर प्रतिनिधी...
-
PM-ABHIM योजनेअंतर्गत सुरु झालेला महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प, गोंदिया जिल्ह्याच्या नागरिकांसाठी ठरणार संजीवनी गोंदिया:- जिल्ह्यात आज ५०...















