मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने

नाव

ईमेल *

मेसेज *

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

आमगाव पोलिसांचे शानदार यश - बेकायदेशीरपणे दारू तस्करी करताना ३५ पेट्या आणि वाहन जप्त!

 आमगाव पोलिसांचे शानदार यश - बेकायदेशीरपणे दारू तस्करी करताना ३५ पेट्या आणि वाहन जप्त!

शहरातील जगनाडे चौकात कारवाई

🖋️ मनोज भालेकर प्रतिनिधी 

आमगाव: मध्य प्रदेशातून छत्तीसगडला दारू तस्करी करताना स्थानिक पोलिसांनी ३५ पेट्या (गोवा व्हिस्की)  आणि झायलो महिंद्रा गाडी क्रमांक CG 07 AS 8938 जप्त केली आहे, ज्याची एकूण किंमत १७,२३,४४४ रुपये आहे! 
वरील कारवाई आज, २१ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी घडल्याचे सांगितले जाते! 

पोळा दिनानिमित्त स्थानिक पोलिसांना यश मिळाले आहे! हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले जात आहे! 
वरील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली आमगाव पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, पो हवा, मन्यार, राजू गजपुरे, बुधराम मेश्राम, हवालदार- नितीन चोपकर, चेतन शेंडे, भागवत कोडापे, विनोद उपराडे, स्वप्नील शेंडे, वाहन चालक योगेश मुनेश्वर मुनगेश्वर यांनी कारवाई पार पाडली.
पोलिसांनी चालक- जुगल किशोर नागवंशी, वय २६, रा. वार्ड क्रमांक ५, भिलाई (दुर्ग), छत्तीसगड याला अटक केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द

धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल

 धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...