मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने

नाव

ईमेल *

मेसेज *

पत्रकार संघ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पत्रकार संघ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२

हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे नवरात्रीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या मातृशक्ती सन्मान सोहळ्यात पोलीस दलातील नारीशक्तींचा सन्मान

 

मलकापूर प्रतिनिधी

  मातृशक्तीच्या उपासनेचे पर्व म्हणजेच नवरात्रोत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जात आहे.या पर्वामध्ये नारीशक्तीचे पूजन करून उपासना करण्यात येते. भारतीय संस्कृतीच्या उदय कालापासूनच मातृ शक्तीचे किती अगाध व मोठे स्थान आपल्याला लाभलेले आहे हे या उत्सवा मधून प्रतीत होत असते. म्हणूनच हिंदी मराठी पत्रकार संघ मलकापूर नेहमी सामाजिक कार्याला केंद्रबिंदू मानून त्यानुसार कार्यरत आहे. 

  त्याचाच एक भाग म्हणून नवरात्रोत्सवानिमित्त या मातृशक्तींचे, नारीशक्तींचे सन्मान रुपी पूजन व्हावे म्हणून विविध क्षेत्रात आपले कार्यरुपी योगदान देणाऱ्या नारीशक्तींचा सन्मान गत सप्ताहभरात सुरू असून आज दि. 1/10/2022 रोजी जनतेच्या रक्षणासाठी म्हणजेच "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" या ब्रीद वाक्याच्या पदपथावर कार्यरत असणाऱ्या म्हणजेच पोलीस दलामध्ये सेवा देणाऱ्या नारीशक्तींचा हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर यांच्याकडून मलकापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या पीएसआय स्मिता म्हसाय मॅडम व पोलीस कॉ.श्रीमती वाढेमॅडम यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देत सन्मान रुपी सत्कार करण्यात आला. 

  यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर,  विदर्भ सचिव सतिष दांडगे,जिल्हाध्यक्ष गौरव खरे,  महासचिव करण सिंग,  तालुका संपर्क प्रमुख धर्मेशसिंह राजपूत,शहर संघटक योगेश सोनवणे, प्रा.प्रकाश थाटे,प्रमोद हिवराळे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

शारदीय नवरात्री निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मातृशक्तींचा हिंदी मराठी पत्रकार संघ मलकापूरतर्फे यथोचित सन्मान

 



धर्मेशसिंह राजपूत प्रतिनिधी

   आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरे करण्यात येतात. त्यापैकीच नवरात्री हा देवीचा उत्सव  संपूर्ण भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. ह्याला शारदीय नवरात्र असेही म्हणतात. देवी मातेने नऊ दिवस दैत्यांशी युद्ध करून महिषासुर नामक राक्षसाचा नाश केला होता म्हणून देवी मातेला महिषासुर मर्दिनी देखील म्हणतात. अशा या शक्तीचा म्हणजेच मातृशक्तीचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने भक्तांकडून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीच्या इतिहासाला मातृशक्तीचे मोठे योगदान लाभलेले आहे. इतिहासाची पाने उलटली तर महाराणी पद्मावती, राजमाता जिजाऊ मासाहेब,माता रमाबाई आंबेडकर,झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, श्रीमती इंदिरा गांधी व नुकतीच भारताच्या सर्वोच्च स्थानी म्हणजे राष्ट्रपतीपदी निवड झाली असणाऱ्या श्रीमती द्रौपदी मूर्मू हे या मातृशक्तीचे प्रतीक आहे. वेळोवेळी या मातृ शक्तीने आपल्या देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी अविस्मरणीय असे कार्य केले आहे. 

या अनुषंघाने नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या,सर्वसामान्य,तळागाळातील जनतेच्या न्याय हक्कासाठी व हितासाठी तसेच समाजोपयोगी सेवेसाठी कटिबद्ध असणाऱ्या हिंदी मराठी पत्रकार संघ मलकापूर यांचे वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे यांच्या मातृशक्ती असणाऱ्या जिजाऊ माॅं साहेब यांचे माहेर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा. अशी पावनभूमी असणाऱ्या, मातृशक्तींचा वारसा लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील माताभगीनींचा- मातृशक्तींचा नवरात्री निमित्त मानसन्मान व आदर व्हावा व त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त व्हावी या उद्देशाने मलकापूर शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मातृशक्तींचा म्हणजेच महिला भगिनींचा सत्कार व सन्मान करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गृहिणी असणाऱ्या मातांचा ज्यांनी कोरोना सारख्या महामारीच्या वेळी सर्वसामान्य असणाऱ्या आपल्या परिवाराचा संसाररुपी गाडा मोठ्या हिंमतीने व धैर्याने ओढत आपल्या परिवाराला यातून अबाधित राखत आज सुखरूप इथपर्यंत आणले म्हणून त्यांच्या धैर्याचा,हिंमतीचा कुठेतरी सन्मान व्हावा म्हणून हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे आज पत्रकार संघाचे कार्यालयावर संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर पाटील यांच्या उपस्थितीत छोटे खाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सौ. सरिताताई बगाडे, सौ. गीताताई देवकर सौ. कुसुमताई वानखेडे, सौ. रेखाताई उगले, सौ. राधाताई वानखेडे या मातृ शक्तींचा पुष्पगुच्छ व गृहोपयोगी भेटवस्तू देत आदरपूर्वक सन्मान व गौरव करण्यात आला. 


तसेच नवरात्रीचे नऊ दिवस विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माता भगिनींचा सत्कार व सन्मान करण्याचे हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे निर्णय घेण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात हिं.म.पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर यांनी एक महिला म्हणून महिलांना आपले जीवन जगतांना,गृहिणी असणाऱ्या माता भगिनींना आपल्या परिवारातील सर्व सदस्यांच्या अडीअडचणी,मानसन्मान सांभाळत किती कसरत करावी लागते याची उपस्थित पत्रकार बांधवांना संबोधित करून माता भगिनींचा सन्मान करण्यात यावा ही काळाची गरज असल्याचे सांगितले.तसेच सौ.सारिकाताई बगाडे यांनी आपल्या सन्मानाला उत्तर देत पत्रकार बांधवांनी आपल्यासारख्या महिलांचा केलेला सन्मान हा वाखाणण्याजोगा असून पत्रकार बांधवांनी केलेल्या सन्मानामुळे आमच्या सारख्या माता भगिनींना हिंमत मिळून   उत्साह वाढतो व आनंद मिळत असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर,  विदर्भ प्रसिध्दी प्रमुख अजय टप,विदर्भ सचिव सतिष दांडगे,

तालुका अध्यक्ष उल्हास भाई शेगोकार,जिल्हाध्यक्ष गौरव खरे, जिल्हा सचिव स्वप्निल आकोटकर, महासचिव करण सिंग, तालुका सचिव श्रीकृष्ण भगत,सहसचिव विनायक तळेकर तालुका संपर्क प्रमुख धर्मेशसिंह राजपूत,विदर्भ ब्यूरो चिफ अपरेश तुपकरी, सह संपर्क प्रमुख प्रदीप इंगळे,शहर संघटक योगेश सोनवणे, मलकापूर प्लसचे प्रतिनिधी संजय वानखेडे, राहूल संबारे, प्रा.प्रकाश थाटे,प्रमोद हिवराळे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

मंगळवार, २६ जुलै, २०२२

हिवरखेड ता.खामगांव येथील ठाणेदारांनी पत्रकाराला दिले सुचना पत्र--ठाणेदारावर कारवाई ची हिंदी मराठी पत्रकार संघाची मागणी

  


 मलकापूर प्रतिनिधी \

    दैनिक सत्यप्रत ने ९ जुलै रोजी हिवरखेड पो.स्टे हिद्दीतील लाखनवाड्यात चालनार्या अवैध वरली मटका जुगाराची बातमी छापली होती म्हणून चिडून जाऊन हिवरखेड ठाणेदार वाघ यांनी दैनिक सत्यप्रत ला गैरकायदेशीरपने सुचनापत्र पाठवले होते. त्या संदर्भात आज मलकापूर येथे हिंदी मराठी पत्रकार संघाचे वतीने मा. उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक व  मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

    या निवेदनात म्हंटले आहे की खामगांव येथील दैनिक सत्यप्रत चे मुख्य संपादक आनंद प्रकाश गायगोळ यांनी दि. ९ जुलै २०१२ रोजी त्यांच्या वृत्तपत्रात लाखनवाडा येथे  वरली मटका जुगार ची बातमी प्रसिध्द केला होती. मात्र ठाणेदार वाघ यांनी त्या जुगार अड्यावर कारवाई करण्याऐवजी संपादक आनंद गायगोळ यांना वेठीस धरून त्यांना सूचनापत्र पाठवुन त्या बातमीचा जाब विचारण्या करीता दि. १८ जुलै २०१२ रोजी सकाळी ११.०० वाजता पोलिस स्टेशन हिवरखेड येथे न चुकता हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

    ठाणेदार गजानन वाघ हे त्यांच्या पदाचा गैरवापर करून आमच्या पत्रकारावर दबाव टाकण्याचा व त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार करत आहे. कायदा हातात घेवून कोणताही अधिकारी पत्रकाराला धमकाविण्याचा प्रयत्न करू शकत नाही. किंवा त्यांच्या लिखानावर गदा आनु शकत नाही. अवैध व्यवसाय सुरू असेल आणि  त्यांच्या बातम्या पत्रकार प्रसिद्ध करत असेल आणि पोलीस प्रशासन त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असेल तर   हिंदी मराठी पत्रकार संघ  लोकशाही मार्गाने आंदोलन  केले जाईल .

    या प्रकरणात वरिष्ठ अधिकार्‍यानी लक्ष घालून हिवरखेड पोलिस स्टेशन चे ठाणेदार गजानन वाघ यांना पत्रकारावर सुड बुद्धीने केलेल्या कारवाई बद्दल समज द्यावी अशी मागणी हिंदी मराठी संघातर्फे करण्यात आली . यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील, श्रीकृष्ण तायडे विदर्भ समन्वयक, सतिष दांडगे विदर्भ सचिव, अजय टप विदर्भ संपर्कप्रमुख, गौरव खरे जिल्हाध्यक्ष, उल्हासभाई शेगोकार तालुकाध्यक्ष, प्रा.कृष्णा मेसरे जिल्हा प्रवक्ता, स्वप्निल आकोटकर जिल्हा सचिव, नागेश सुरंगे जिल्हा संपर्कप्रमुख, अनिल गोठी तालुका उपाध्यक्ष, कैलास काळे तालुका प्रसिद्धीप्रमुख, धर्मेशसिंह राजपूत तालुका संपर्कप्रमुख, करण झनके तालुका संघटक, प्रदीप इंगळे सह संपर्कप्रमुख, श्रीकृष्ण भगत शहर सचिव, योगेश सोनोने सह संघटक,  विनायक तळेकर सहसचिव, प्रा. प्रकाश थाटे कोषाध्यक्ष, अपरेश तुपकरी, एन.के.हिवराळे, पंकज मोरे इत्यादी सह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.


 

शनिवार, १६ जुलै, २०२२

हिंदी - मराठी पत्रकार संघाच्या मोताळा तालुका अध्यक्ष पदी सॅंडीभाऊ मेढे तर उपाध्यक्षपदी गणेश वाघ

  




मोताळा प्रतिनिधी :- 

पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे सॅंडीभाऊ मेढे यांची हिंदी मराठी पत्रकार संघाच्या मोताळा तालुकाध्यक्ष पदी तर उपाध्यक्षपदी गणेश वाघ यांची नियुक्ती करण्यात आली.सदर निवड तळागळातील शोषित,पिडित,वंचितांना न्याय मिळवून द्यावा हीच आशा बाळगत निवड करण्यात आली आहे तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली. मोताळा येथील पत्रकार  क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे  संदेश मेढे  यांची तालुका अध्यक्ष तर गणेश वाघ यांची तालुका उपाध्यक्ष हिंदी-मराठी पत्रकार संघटने च्या  पदी निवड करण्यात आली आहे.सदर निवड महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहाल व सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आशा बाळगत सदर निवड करण्यात आली आहे.

तर   महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली त्यावेळी ,  उल्हास शेगोकार तालुकाध्यक्ष,   अजय टप विदर्भ प्रसिद्धी प्रमुख,सतीश दांडगे विदर्भ सचिव, श्रीकृष्ण तायडे विदर्भ समन्वयक,  गौरव खरे जिल्हाध्यक्ष , कृष्णा मेसरे जिल्हा प्रवक्ता, स्वप्निल आकोटकर जिल्हा सचिव , नागेश सुरंगे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख , अनिल गोठी तालुका उपाध्यक्ष, श्रीकृष्ण भगत तालुका सचिव , 
शेख निसार सह संघटक,करण झनके तालुका संघटक,  कैलास काळे प्रसिद्धीप्रमुख तालुका,
विनायक तळेकर शहर सहसचिव,
 योगेश कुमार सोनवणे शहर सह संघटक, धर्मेश सिंह राजपूत संघटक , अनिल धनके शहर संपर्कप्रमुख, प्रदीप इंगळे संपर्कप्रमुख, प्रा प्रकाश थाटे, प्रमोद हिवराळे  हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देऊन  निवड करण्यात आली आहे.

सदर निवडीबद्दल संदेश मेढे व गणेश वाघ यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द

धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल

 धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...