मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने

नाव

ईमेल *

मेसेज *

जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५

मूर्ती विसर्जनात नवीन राष्ट्रीय महामार्ग अडथळा ठरतो, आमदार विनोद अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना प्रवेश रस्ता करण्याचे निर्देश दिले..

 मूर्ती विसर्जनात नवीन राष्ट्रीय महामार्ग अडथळा ठरतो, आमदार विनोद अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना प्रवेश रस्ता करण्याचे निर्देश दिले..



मुरपार, धामणगाव आणि सातोना येथे बस थांबा, दुभाजक क्रॉसिंग उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा


गोंदिया:२७ ऑगस्टपासून बाप्पाचे आगमन होणार आहे. शहरात श्री गणेशाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू आहे. एकीकडे बाप्पाच्या आगमनाबद्दल उत्साह आहे, तर दुसरीकडे सार्वजनिक मंडळेही बाप्पाच्या प्रस्थानाबद्दल चिंतेत आहेत. चिंतेचा विषय म्हणजे राजेगाव बाग नदीवर बांधलेला नवीन राष्ट्रीय महामार्ग.
कोर्णीच्या बाग नदी घाटावर नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामामुळे मूर्ती विसर्जनात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. महामार्गाखाली बांधलेल्या अंडरपासमधून शहरातील श्री गणेश आणि माँ दुर्गेच्या बहुतेक मोठ्या मूर्ती नेणे शक्य नाही. त्याच वेळी, विसर्जन क्षेत्रात बांधलेल्या रस्त्यावरील ढिगाऱ्यांमुळे परिस्थिती गंभीर आहे.
या संदर्भात अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे आणि दुर्गा उत्सव समित्यांनी परिसरातील आमदार विनोद अग्रवाल यांना मूर्ती विसर्जनातील अडथळ्यांबद्दल माहिती दिली होती आणि त्या सोडवण्याबाबत चर्चा केली होती.
आमदार विनोद अग्रवाल यांनी मूर्ती विसर्जनाच्या या गंभीर समस्येला प्राधान्य देत आज जिल्हा दंडाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांसह राजेगाव बागनदी घाटावर पोहोचले आणि विसर्जन क्षेत्राची पाहणी केली.
निरीक्षणादरम्यान असे दिसून आले की गोंदियाहून मूर्ती थेट लहान कल्व्हर्टवरून विसर्जन क्षेत्रात नेणे शक्य नाही. नव्याने बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या अंडरपासची उंची कमी असल्याने नदीघाटाकडे जाणारा रस्ताही महामार्गाच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे, ज्यामुळे अडथळा निर्माण होत आहे.
आमदार विनोद अग्रवाल यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून नदीच्या पलीकडे असलेल्या राजेगाव (मध्य प्रदेश) पासून रस्ता लवकरात लवकर व्यवस्थित करण्याचे आणि कोरणी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचरा लवकरात लवकर काढून रस्त्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. जेणेकरून परतीच्या प्रवासादरम्यान वाहन सहजपणे अंडरपासमधून जाऊ शकेल.
येत्या काळात सातोना येथील महादेव घाटावर मूर्ती विसर्जनासाठी परिसराची तपासणी केली जाईल..
या वर्षी कोरणी घाटावरील अडथळा दूर करून मूर्ती विसर्जनाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी सातोना येथील बाग नदीवरील महादेव घाटाची पाहणी केली. नदीकडे जाणारा रस्ता रुंदीकरण करण्यासाठी आणि घाट परिसराचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांनी सरपंच सातोना संदीप तुरकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. गोंदिया शहर आणि ग्रामीण भागातून शेकडो मूर्ती बाग नदीत विसर्जित केल्या जातात हे उल्लेखनीय आहे. विसर्जन अडथळामुक्त व्हावे यासाठी नवीन पर्याय तयार करणे आवश्यक झाले आहे, ज्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांची भूमिका सकारात्मक आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील मुरपार, धामणगाव आणि सातोना येथे बस थांबे आणि दुभाजक क्रॉसिंग बांधले जातील..
नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामादरम्यान, महामार्ग प्राधिकरणाने मुरपार, धामणगाव आणि सातोना येथे रस्ता तयार केला आहे आणि गावाकडे जाणाऱ्या मार्गात अडथळा निर्माण केला आहे. गावकऱ्यांना बस स्टॉपवर जाण्यासाठी दुभाजक उडी मारून आणि वाहनाने लांब अंतर प्रवास करून रस्ता ओलांडावा लागतो. या प्रकरणी आमदार विनोद अग्रवाल यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना गावाजवळील अप्रोच रोडवर दुभाजक क्रॉसिंग उपलब्ध करून देण्याचे आणि बस स्टॉप बांधण्याचे निर्देश दिले.
या पाहणीदरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या छिंदवाडा विभागातील श्री मंडल, श्री बिसेन, अनुप कटरे, सातोना सरपंच संदीप तुरकर, सागर कदम, आनंद वासनिक, सुजित येवले इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२

शारदीय नवरात्री निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मातृशक्तींचा हिंदी मराठी पत्रकार संघ मलकापूरतर्फे यथोचित सन्मान

 



धर्मेशसिंह राजपूत प्रतिनिधी

   आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरे करण्यात येतात. त्यापैकीच नवरात्री हा देवीचा उत्सव  संपूर्ण भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. ह्याला शारदीय नवरात्र असेही म्हणतात. देवी मातेने नऊ दिवस दैत्यांशी युद्ध करून महिषासुर नामक राक्षसाचा नाश केला होता म्हणून देवी मातेला महिषासुर मर्दिनी देखील म्हणतात. अशा या शक्तीचा म्हणजेच मातृशक्तीचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने भक्तांकडून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीच्या इतिहासाला मातृशक्तीचे मोठे योगदान लाभलेले आहे. इतिहासाची पाने उलटली तर महाराणी पद्मावती, राजमाता जिजाऊ मासाहेब,माता रमाबाई आंबेडकर,झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, श्रीमती इंदिरा गांधी व नुकतीच भारताच्या सर्वोच्च स्थानी म्हणजे राष्ट्रपतीपदी निवड झाली असणाऱ्या श्रीमती द्रौपदी मूर्मू हे या मातृशक्तीचे प्रतीक आहे. वेळोवेळी या मातृ शक्तीने आपल्या देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी अविस्मरणीय असे कार्य केले आहे. 

या अनुषंघाने नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या,सर्वसामान्य,तळागाळातील जनतेच्या न्याय हक्कासाठी व हितासाठी तसेच समाजोपयोगी सेवेसाठी कटिबद्ध असणाऱ्या हिंदी मराठी पत्रकार संघ मलकापूर यांचे वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे यांच्या मातृशक्ती असणाऱ्या जिजाऊ माॅं साहेब यांचे माहेर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा. अशी पावनभूमी असणाऱ्या, मातृशक्तींचा वारसा लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील माताभगीनींचा- मातृशक्तींचा नवरात्री निमित्त मानसन्मान व आदर व्हावा व त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त व्हावी या उद्देशाने मलकापूर शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मातृशक्तींचा म्हणजेच महिला भगिनींचा सत्कार व सन्मान करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गृहिणी असणाऱ्या मातांचा ज्यांनी कोरोना सारख्या महामारीच्या वेळी सर्वसामान्य असणाऱ्या आपल्या परिवाराचा संसाररुपी गाडा मोठ्या हिंमतीने व धैर्याने ओढत आपल्या परिवाराला यातून अबाधित राखत आज सुखरूप इथपर्यंत आणले म्हणून त्यांच्या धैर्याचा,हिंमतीचा कुठेतरी सन्मान व्हावा म्हणून हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे आज पत्रकार संघाचे कार्यालयावर संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर पाटील यांच्या उपस्थितीत छोटे खाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सौ. सरिताताई बगाडे, सौ. गीताताई देवकर सौ. कुसुमताई वानखेडे, सौ. रेखाताई उगले, सौ. राधाताई वानखेडे या मातृ शक्तींचा पुष्पगुच्छ व गृहोपयोगी भेटवस्तू देत आदरपूर्वक सन्मान व गौरव करण्यात आला. 


तसेच नवरात्रीचे नऊ दिवस विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माता भगिनींचा सत्कार व सन्मान करण्याचे हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे निर्णय घेण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात हिं.म.पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर यांनी एक महिला म्हणून महिलांना आपले जीवन जगतांना,गृहिणी असणाऱ्या माता भगिनींना आपल्या परिवारातील सर्व सदस्यांच्या अडीअडचणी,मानसन्मान सांभाळत किती कसरत करावी लागते याची उपस्थित पत्रकार बांधवांना संबोधित करून माता भगिनींचा सन्मान करण्यात यावा ही काळाची गरज असल्याचे सांगितले.तसेच सौ.सारिकाताई बगाडे यांनी आपल्या सन्मानाला उत्तर देत पत्रकार बांधवांनी आपल्यासारख्या महिलांचा केलेला सन्मान हा वाखाणण्याजोगा असून पत्रकार बांधवांनी केलेल्या सन्मानामुळे आमच्या सारख्या माता भगिनींना हिंमत मिळून   उत्साह वाढतो व आनंद मिळत असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर,  विदर्भ प्रसिध्दी प्रमुख अजय टप,विदर्भ सचिव सतिष दांडगे,

तालुका अध्यक्ष उल्हास भाई शेगोकार,जिल्हाध्यक्ष गौरव खरे, जिल्हा सचिव स्वप्निल आकोटकर, महासचिव करण सिंग, तालुका सचिव श्रीकृष्ण भगत,सहसचिव विनायक तळेकर तालुका संपर्क प्रमुख धर्मेशसिंह राजपूत,विदर्भ ब्यूरो चिफ अपरेश तुपकरी, सह संपर्क प्रमुख प्रदीप इंगळे,शहर संघटक योगेश सोनवणे, मलकापूर प्लसचे प्रतिनिधी संजय वानखेडे, राहूल संबारे, प्रा.प्रकाश थाटे,प्रमोद हिवराळे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

शनिवार, १६ जुलै, २०२२

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

  

मलकापूर प्रतिनिधी 

    भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मलकापूर येथे दिनांक 12/ 7/ 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता भारतीय जनता युवा मोर्चाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येशी यांच्या नेतृत्वात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते भाजप युवा मोर्चाच्या 13 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

     त्यावेळी प्रमुख उपस्थिती मलकापूर भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष अमोल भाऊ टप, भाजपा युवा नेते रविभाऊ वानखेडे, कामगार आघाडी शहराध्यक्ष अजय बघे, साहेबराव खराटे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष sc सेल आकाश भाऊ गोरे,  ओम टप,देविन टाक, किशन सोनवणे ,आनंद निधाने,  राम बैरागी, प्रशांत पाटील, रवी पाटील, गजानन निंबाळकर, विकास गोरे, गोलू वाकोडे, विशाल ठाकूर,सागर तायडे, विशाल पाटील,ई. युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द

धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल

 धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...