मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने

नाव

ईमेल *

मेसेज *

शुक्रवार, ६ जून, २०२५

पोलीस मुख्यालय गोंदिया, (कारंजा) येथे समर कॅम्प-२०२५ चे समारोपीय कार्यक्रम संपन्न


 पोलीस मुख्यालय गोंदिया, (कारंजा) येथे समर कॅम्प-२०२५ चे समारोपीय कार्यक्रम संपन्न


🖊️ मनोज भालेकर प्रतिनिधी 

गोंदिया :०५ जून २०२५ रोजी "प्रेरणा सभागृह", पोलीस मुख्यालय गोंदिया येथे प्रमुख अतिथी मा. श्रीमती रोशनी भामरे, मॅडम यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलित करुन समर कॅम्प २०२५ चे समारोप समारंभ कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक तथा अति. कार्य. पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) श्रीमती नंदिनी चानपुरकर यांच्या हस्ते प्रमुख अतिथी यांना भेटवस्तु व पुष्पगुच्छ देवुन त्यांचे स्वागत करण्यात आले. गोंदिया जिल्हा पोलीस विभागातर्फे पोलीस अधिकारी/अंमलदार/मंत्रालयीन स्टाफ यांच्या पाल्यांकरिता दिनांक ०७/०५/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत समर कॅम्प मध्ये फुटबॉल, चेस, व्हॉलीबॉल, स्पोकन इंग्लिश व डॉन्स प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले होते.

       ०१ महिना चालणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व मुले - मुलींना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्रीमती रोशनी भामरे, मॅडम यांच्या शुभहस्ते स्मृती चिन्हे व प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करुन गोंदिया जिल्हा पोलीस विभागामार्फत पोलीस पाल्यांचे खेळातील कौशल्य व नैपुण्य वृध्दींगत करण्यासाठी तसेच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ गुणांना वाव मिळावा व त्यांच्यामध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी या संकल्पनेतुन पोलीस पाल्यांना त्यांच्या पुढील वाटचाली करिता भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

      गोंदिया जिल्हा पोलीस विभागातील फुटबॉल कोच अकिल कुरैशी, व्हॉलीबॉल कोच दुर्योधन हनवते, चेस (बुध्दीबळ) कोच श्री डिगेश्वर चौरे व प्रभाकर पालांदुरकर, स्पोकन इंग्लिश प्रशिक्षक श्री किशोर कटरे व साई ग्रुप गोंदिया येथील डॉन्स प्रशिक्षक निखलेश शेंद्रे व सुरु सेंद्रे यांच्याकडुन पोलीस पाल्यांना अतलुनीय असे उत्कृष्ठपणे प्रशिक्षण देण्यात आले. सदर कार्यक्रमात पोलीस निरीक्षक श्रीमती नंदिनी चानपुरकर, राखीव पोलीस निरीक्षक श्री रमेश चाकाटे, त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हयातील पोलीस अंमलदार तसेच त्यांचे कुटुंबीय व पाल्य हे मोठया संख्येने उपस्थित होते.


         सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन मपोहवा मंगला प्रधान व आभार प्रदर्शन पो.नि. नंदिनी चानपुरकर, यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता पोनि नंदिनी चानपुरकर,रापोनि रमेश चाकाटे, गेम इंजार्च दिपक दत्ता, श्रेणी पोउप- निरीक्षक रोशन उईके, सफौ मुस्तफा सरवर, पोहवा पंकज पांडे, चंद्रकांत बरकुंड, मपोहवा तारीका भोयर, पोहवा राजु डोंगरे व राज वैद्य तसेच पोलीस मुख्यालय गोंदिया येथील डी. आय. स्टाफ यांनी अथक परिश्रम मेहनत घेतली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द

धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल

 धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...