मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने

नाव

ईमेल *

मेसेज *

रविवार, २७ जुलै, २०२५

बनगाव येथील थेर मोहल्ला विविध समस्यांनी ग्रस्त नाली व रस्त्याची दुर्दशा

 बनगाव येथील थेर  मोहल्ला विविध समस्यांनी ग्रस्त नाली व रस्त्याची दुर्दशा 


🖊️ मनोज भालेकर प्रतिनिधी 

आमगाव : येथील नगर पंचायत अंतर्गत ग्राम बनगाव येथील थेरं मोहल्ला वार्ड नं ३ येथे रस्ता व नाली नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.
बनगाव येथील अनेक वार्डाची दैनिय अवस्था झाली असून अधिकारी डोळे झाक करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
थेरं गल्लीत  १३ वर्ष पूर्वी सिमेंट रस्ता तयार करण्यात आला पण त्या ठिकाणी जागोजागी खड्डे पडले असून नागरिकांना ये जा करणे कठीण झाले आहे.
सदर रस्त्यावर शेतकऱ्यांना आपले धान्य नेण्यासाठी बैलबंड्डी, टॅक्टर उपयोग करता येत नाही.या रस्त्याची लांबी तीनशे पन्नास मिटरची असून नवीन रस्त्याची मागणी होत आहे.
येथे रस्त्याच्या लगतं नाली खंडित झाल्याने येथील सांडपाणी त्या ठिकाणी साचून राहते, त्यामुळे डासांचा प्रकोप वाढला आहे, या वार्डात महामारीची शक्यता नाकारता येत नाही.
येथील समस्याचे निराकरण करण्यात यावे अशी मागणी  मुख्याधिकारी प्रमोद कांबळे यांना, ग्यानीराम फुंडे, तुकाराम थेरं, प्रेमकुमार थेरं, किशोर फुंडे, राजीव फुंडे,संजू थेरं, शिवा थेरं, लखन थेरं, सुखराम थेरं, लक्ष्मण फुंडे, पुनाराम मेंढे, बुधराम थेर, राधणबाई सहारे, पुस्तकला सहारे, तुळशीराम थेर, अंकित मेंढे आदींनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द

धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल

 धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...