मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने

नाव

ईमेल *

मेसेज *

बुधवार, २५ जून, २०२५

बिरसी विमानतळावरून उडान योजनेंतर्गत महानगरांसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाला पाठवले पत्र

 बिरसी विमानतळावरून उडान योजनेंतर्गत महानगरांसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाला पाठवले पत्र


🖊️ मनोज भालेकर प्रतिनिधी 

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे यांनी गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळावरून मुंबई, पुणे, दिल्ली आणि कोलकाता यांसारख्या महानगरांसाठी विमान सेवा सुरू करण्याची मागणी भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाकडे केली आहे.

ही मागणी केंद्र सरकारच्या ‘उडान’ (UDAN) योजनेअंतर्गत करण्यात आली असून, त्याद्वारे प्रादेशिक हवाई संपर्क वाढवून नागरिकांना स्वस्त व सुलभ प्रवासाची सुविधा मिळावी, हा उद्देश आहे. सध्या गोंदियाहून हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे.

खासदार डॉ. पडोळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की –

 "गोंदिया हा कृषी व औद्योगिकदृष्ट्या महत्वाचा जिल्हा असून देखील तो अद्याप प्रमुख महानगरांशी हवाई मार्गाने जोडलेला नाही. बिरसी विमानतळावरून थेट विमानसेवा सुरू झाल्यास येथील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठा फायदा होईल, तसेच प्रादेशिक विकासालाही चालना मिळेल."

उडान योजनेंतर्गत गोंदिया जिल्ह्याला हवाई नकाशावर ठळकपणे स्थान मिळावे, यासाठी त्यांनी सदर प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता द्यावी, अशी मागणी मंत्रालयाकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द

धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल

 धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...