मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने

नाव

ईमेल *

मेसेज *

मंगळवार, १९ जुलै, २०२२

परित्राण पाठाने युवा पिढीवर संस्कार घडतात -भंते संघपाल


परित्राण पाठाने युवा पिढीवर संस्कार घडतात -भंते संघपाल


  परित्राण पाठाने युवा पिढीवर संस्कार घडतात प्रत्येकाने आपल्या घरी परित्राण पाठ ठेवून किंवा बुद्ध विहारात प्रत्येक रविवारी जाऊन मुला बाळासह कुटुंब जाऊन परित्राण पाठाचे अध्ययन करावे त्याने येणाऱ्या पिढीवर संस्कार घडतात असे प्रतिपादन भंते संघपाल यांनी पत्रकार संतोष तोताराम दांडगे  यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त ठेवण्यात आलेल्या बुद्ध पूजा व परित्राण पाठ प्रसंगी प्रवचनातून सांगितले .

  यावेळी पत्रकार सतीश दांडगे यांचे मोठे बंधू कालकतीत संतोष दांडगे यांच्या चौथ्या स्मृतीदिना निमित्त घरी ठेवण्यात आलेल्या बुद्ध पूजा व परित्राण पाठ प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना भंते संघपाल म्हणाले की हा वर्षवासाचा महिना सुरू आहे यामध्ये उपवास व प्रत्येक बुद्ध विहारांमध्ये बुद्ध आणि त्याच्या धम्माचे पठण सुरू असतात त्या ठिकाणी  परिवारासह जाऊन ऐका याने परिवारामध्ये परिवर्तन घडत असते .



  त्यावेळी शोभाबाई दांडगे, पत्रकार सतीश दांडगे, पत्रकार उल्हास शेगोकार, माजी नगरसेविका सुमनताई इंगळे, रजनीताई शेगोकार,ज्योती दांडगे, सिद्धार्थ इंगळे, देविदास इंगळे, अजय तायडे ,मुकेश सुरवाडे, प्रणय इंगळे,रोहित दांडगे,प्रथमेश दांडगे,तक्षक दांडगे, तथा धम्म उपासक उपासिका तथा बाल बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द

धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल

 धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...