मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने

नाव

ईमेल *

मेसेज *

रविवार, ३० मार्च, २०२५

संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी देशाला पुढे घेऊन जाणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी देशाला पुढे घेऊन जाणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

• माधव नेत्रालयाने जनतेच्या जीवनात प्रकाश आणण्याचे महत्तम कार्य केले
 
•माधव नेत्रालय मध्य भारतातील आरोग्य क्षेत्रात महत्वाची नेत्र संस्था ठरेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
•माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमिपूजन
 
•केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

नागपुर/ गोंदिया,दि.30 : संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी याचा अवलंब करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी केंद्र शासन कसोशीने कार्य करीत आहे. माधव नेत्रालयानेही या कार्यात योगदान देत गेल्या तीन दशकांपासून लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे मोलाचे कार्य केल्याचे गौरवोद्गार, त्यांनी काढले. 
               हिंगणा रोड वरील माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, स्वामी अवधेशानंद गिरी, स्वामी गोविंद देव गिरी, माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे सरचिटणीस डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री यावेळी उपस्थित होते.
               पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले, पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना आरोग्य  क्षेत्रातील सुधारणांमध्ये देशाला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प जाहीर केला. गेल्या दशकात ग्रामीण भागात लाखो आयुष्मान भारत केंद्रे उभारण्यात आली. कोट्यवधी लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. टेलिमेडिसिनद्वारे उपचार व आरोग्य सेवा सशक्त करण्यात आल्या. एम्ससारख्या संस्थांची संख्या तिपटीने वाढविण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच देशात वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत उपलब्ध करून दिले. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. योग आणि आयुर्वेदालाही जगात मानाचे स्थान मिळाले आहे. आरोग्य सेवेपासून कुणी वंचित राहू नये असे शासनाचे धोरण असून त्यानुसार सक्षमपणे कार्य सुरू आहे. 
            आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यात आले. आयुष्मान भारतसारख्या योजनांद्वारे गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. आरोग्य क्षेत्रातील सुधारणांचा हाच वसा माधव नेत्रालय पुढे घेऊन जात आहे.  द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरुजी यांच्या आदर्शावर मार्गक्रमण करत नेत्रालयाने अंध:कार दूर करीत लोकांच्या जीवनात प्रकाश आणला आहे. प्रीमियम सेंटरमुळे या नेत्रालयाच्या कार्याचा विस्तार होऊन त्यास गती मिळेल. तसेच देशातील आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीतही या संस्थेचे भरीव योगदान राहील.
                 विदर्भातील थोर संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हे जन्मतः अंध होते. मात्र अंधत्वावर मात करीत त्यांनी ज्ञानाची दृष्टी विकसित केली. दृष्टी बोधातून येते व विवेकातून प्रगट होते याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ अशा देशातील संतांनी भारताला एकसंध ठेवत उत्तम शिकवण दिली. माधव नेत्रालयानेही त्यांच्या विचारांची कास धरत कार्य केले आहे. समाजसेवेचे हे कार्य अव्याहत पुढे जावे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.


                                                                

गुरुवार, २७ मार्च, २०२५

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी घेतला विकास योजनांचा आढावा

 

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी घेतला विकास योजनांचा आढावा.




            गोंदिया, दि. 27: जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सर्व योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, या योजनेचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तीला देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभा कक्षामध्ये आज जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतांना त्यांनी जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी भैयासाहेब बेहेरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील धोंगडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रावार, मुख्याधिकारी सालेकसा प्रमोद कांबळे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ अल्पसंख्याक घटकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न करावा, असे श्री. गांधी यावेळी म्हणाले.

गोंदिया शहरामध्ये जैन समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येत्या काळात गोंदिया येथे संत निवासाची व्यवस्था होण्यासाठी बहु उपयोगी हॉलची व्यवस्था करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. या कामासाठी आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अल्पसंख्यांक बहूल व नागरीक्षेत्र विकास योजना, प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमा अंतर्गत संविधान भवनासाठी 15 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झालेला आहे याला लवकरच मंजुरी देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

 या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य करेल, असे श्री. गांधी यांनी सांगितले.
ललित गांधी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

भगवान महावीर स्वामी यांचे  निर्वाण वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील विजेत्या विद्यार्थ्यांना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

स्पर्धेमध्ये श्री.महावीर मारवाडी शाळा येथील वेद पारधी व विवेक मंदिर स्कूल गोंदिया येथील हर्षीता मदनकर हिला प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. व्दितीय पुरस्कार राजस्थान कन्या विद्यालय येथील प्राची डोंगरे, राजा गोस्वामी, तृतीय पुरस्कार विवेक मंदिर स्कूल येथील स्वाती श्रीभात्रे, निकुंज शर्मा, यांना देण्यात आला. चतुर्थ पुरस्कार विवेक मंदिर स्कूल येथील गीतेश उरकुडे, निष्ठा टेंभुर्णीकर तर सरस्वती शिशु मंदिर प्राथमिक शाळा येथील श्रृष्टी गजभिये, श्री महाविर मारवाडी स्कुल चेतना चंद्रवंशी हीला पाचवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना श्री. गांधी म्हणाले की, भगवान महावीरांचे अनेकांतवादाचे विचार सामाजिक आणि जागतिक शांततेसाठी महत्त्वपूर्ण आहेत. आजही जगाला ते मार्गदर्शक ठरत आहेत. या स्पर्धेसाठी राज्यातील 16 लक्ष विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये गोंदिया जिल्ह्यातील 400 विद्यार्थी सहभागी झाले.

श्री. गांधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शालेय जीवनामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजीत केल्या मुळे विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळतो. शाळांनी विविध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे. कार्यक्रमाचे आभार शालेय शिक्षण विभागाचे महेंद्र गजभिये यांनी मानले.

                                                            

गुरुवार, १३ मार्च, २०२५

विज बिलात वाढ झाल्याने ग्राहक त्रस्त,वाढीमुळे ग्राहकांची लुट

       विज बिलात वाढ झाल्याने ग्राहक त्रस्त, वाढीमुळे ग्राहकांची लुट 
 🖊️ तामेश्वर पंधरे 

आमगाव: सध्या वीज बिलात वाढ झाल्याने ग्राहक त्रस्त आणि या वाढीमुळे ग्राहकांची लुट होत असल्याचं मत व्यक्त होत आहे. वाढत्या महागाईने नागरिक हैराण झाले आहेत, त्यावर महावितरणने विज बिलात वाढ करून अतिरीक्त सुरक्षा रक्कम लाटून ग्राहकांना विजेचा झटका दिला आहे. तर दुसरीकडे आता महावितरण कडून पूर्व कल्पना नदेता विजेच्या खांबावर मीटर व घरगुती मीटर बदलविण्याचे काम चालु आहे. वीजविभाग सिक्युरिटी माध्यमातून दर वर्षी पैसे घेते अशा स्थितीत कुणाची आणि कोणती सुरक्षा ? असा प्रश्न उभा केला जात आहे.

आमगाव तालुक्यातील काही क्षेत्रामध्ये नियमित वीज बिल भरणा करणाऱ्या ग्राहकांच्या घरगुती विजेचा मीटर महावितरण वीज कंपन्याचे कार्यरत कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांकडून विज मीटर काढण्यात आले व त्या जागी नवीन मीटर बसविण्यात आले. पण वीज बिलात वाढ झाल्याने ग्राहक त्रस्त आणि या वाढीमुळे ग्राहकांची लुट होत असल्याचं मत व्यक्त होत आहे. ग्राहकाच्या कित्येक अशा समस्या आहेत की, त्यांचा कधीच निर्णय लागत नाही. जसे की, चुकीच्या बिलाची तक्रार करायला गेल्यास विज वितरण कंपनीचा "आधी वीज बिल भरा मग बघु"असा पवित्र असतो तक्रार नोंदवून ट्रांजकसन आयडी देऊन सुध्दा त्यांनीच दिलेला बिल बरोबर आहे असे समजले जाते.

महावितरण विभागातील कर्मचाऱ्यांच्या या वृत्तीबदल ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मंगळवार, ४ मार्च, २०२५

माल्ही शंभुटोला रस्ता लाखो रुपये खर्चुन सहा महिन्यात खराब

 माल्ही शंभुटोला रस्ता लाखो रुपये खर्चुन सहा महिन्यात खराब 


आमगाव: तालुक्यातील माल्ही शंभुटोला दोन गावाला जोडणारा रस्ता सहा महिन्यात खराब झाल्याचे निदर्शनात येत आहे. माल्ही शंभुटोला रस्ता ग्रामीण २० सा.क्र.०/०० ता. आमगाव कामाचे नाव असुन कार्यान्वित यंत्रणा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया अंतर्गत दिनांक २५/८/२०२४ ला काम सुरु झाल्याचा दिनांक आहे .माहिती तक्त्या वर काम पूर्ण झाल्याचा दिनांक उल्लेखही नाही. संपूर्ण सिमेंट काँक्रिट रस्ता निकृष्ट दर्जाचा असून अत्यंत अल्प प्रमाणात सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. रस्त्याच्या मधोमध मोठ मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असुन निकृष्ट दर्जाचा बांधकाम केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.या रस्त्याची तपासणी गुण नियंत्रण प्रयोगशाळे मार्फत केल्यास आणखी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.या ठिकाणी काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याचे जनावर खाली पाडले असता पायाला दुखापत झाली होती. असे प्रकार अनेकदा येथे घडत आहेत.लाखो रुपये खर्चून बांधलेला रस्ता सहा महिन्यात खराब झाला.ठेकेदारांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखोचा भ्रष्टाचार केला. या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. सदर अंतर्गत सिमेंट रस्त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.अन्यथा आंदोलन करू, असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. (वार्ताहर)

अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द

धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल

 धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...