मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने

नाव

ईमेल *

मेसेज *

शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल

 धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल



मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभागासोबत झाली महत्त्वाची बैठक

प्रतिनिधी।

गोंदिया। समर्थन मूल्यावर धान खरेदी अंतर्गत मार्केटिंग फेडरेशनने धान खरेदीचे ऑनलाइन नोंदणीकरण करण्यासाठी नवीन पद्धतीने बीम ॲपच्या माध्यमातून सुरुवात केली आहे. परंतु या ॲपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अनेक धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात धानाचे चुकारे आणि बोनस रक्कम अद्याप जमा झालेली नाही.

या प्रकरणावर धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले. आमदार अग्रवाल यांनी या बाबीचे संज्ञान घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांची व्यथा प्रत्यक्ष सांगितली आणि त्वरित तोडगा काढण्याची विनंती केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तात्काळ आदेशानंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीस श्री. अनिल डिग्गीकर, सचिव – अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, श्री. पवार, महाव्यवस्थापक – मार्केटिंग फेडरेशन, श्री. भगवान घाडगे, उपसचिव – वित्तीय सल्लागार, श्री. राऊत, उपसचिव, श्री. सुशांत पाटील – डेक्स ऑफिसर तसेच श्री. बाबाराव सूर्यवंशी – बीम पोर्टल उपस्थित होते.

आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान शासकीय समर्थन मूल्यावर मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी केले जाते. या दोन्ही मंडळांनी यापूर्वी एनईएमएल ॲपद्वारे शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी केली होती. परंतु आता मार्केटिंग फेडरेशनने आपले नवीन ॲप बीम ॲप सुरू केले असून त्याद्वारेच ऑनलाइन नोंदणी केली जात आहे.

या बीम ॲप अंतर्गत होत असलेल्या नोंदणी प्रक्रियेत मोठ्या त्रुटी समोर येत आहेत. यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे व बोनस रक्कम जमा झाली आहे, मात्र अजूनही अनेक लाभार्थी शेतकरी असे आहेत ज्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा झालेली नाही.

आमदार अग्रवाल म्हणाले की, बीम ॲपमधील उणिवा तात्काळ दुरुस्त करून सर्व शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करून त्यांच्या खात्यात धानाचे चुकारे व बोनस रक्कम जमा करण्यात यावी.

या प्रकरणावर अन्न पुरवठा विभागाने सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून बीम ॲपमधील समस्या दूर करून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले. आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. सर्व पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.

सोमवार, १ सप्टेंबर, २०२५

पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी/अंमलदारांचे समारोप सत्कार सभारंभाचे आयोजन


पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी/अंमलदारांचे समारोप सत्कार सभारंभाचे आयोजन



🖋️ मनोज भालेकर प्रतिनिधी 

गोंदिया: माहे ऑगस्ट/२०२५ मध्ये  नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे दिनांक ०१/०९/२०२५ रोजी समारोप सत्कार सभारंभाचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथील Coneference Hall मध्ये आयोजित करण्यात आले होते.   सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.



१) पोलीस उप-निरीक्षक श्री. सुखदेव राऊत
२) श्रेणी पोलीस उप-निरीक्षक श्री. प्रदिप मेश्राम
३) सहायक पोलीस उप-निरीक्षक श्री. उध्दव राऊत
४) नाईक पोलीस कॉन्सटेबल श्री. उमेश गायधने
सदर सेवानिवृत्त सत्कार सभारंभ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे यांचे शुभ हस्ते त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थित त्यांना शाल, श्रीफळ, झाडाची रोपटे, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतीचिन्हे व भेट वस्तु देवुन त्यांचे सत्कार करण्यात आले. तद्नंतर सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांनी त्यांच्या कारर्गिद काळात पोलीस विभागात सेवा दिल्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले, आणि मा. पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी त्यांच्या येणा-या पुढील उज्वल भविष्याकरिता हार्दिक शुभेच्छा देवुन त्यांनी पोलीस विभागात केलेल्या कामगिरीबद्दल गौरवउद्‌गार काढले.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन पोलीस निरीक्षक श्रीमती नंदिनी चानपुरकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता पोहवा लियोनार्ड मार्टीन व राज वैद्य यांनी अथक परोश्रम घेतले.


अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द

धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल

 धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...