गुरु-शिष्य मिलन समारोह🖊️ मनोज भालेकर प्रतिनिधी
आमगाव:14 जून 2025 ला जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथे वर्ष 1991 ला वर्ग 10 वी ला शिकत असलेल्या बॅचचे गुरु-शिष्य मिलन समारोह साजरा करण्यात आले.
जि.प.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथे वर्ष 1991 ला वर्ग 10 वी च्या बॅचला शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी 35 वर्षानंतर आपल्याला शिकवणारे शिक्षकांचा व वर्ग मित्रांचा शोध घेवुन दि. 14.06.2025 रोजी जि.प.हायस्कूल आमगाव शाळेत "गुरु-शिष्य मिलन समारोह " मोठया उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत म्हणून मृत पावलेले शिक्षक व विद्यार्थी तसेच अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत पावलेले प्रवाश्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली देऊन करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेत सध्या कार्यरत असलेल्या आ.प्राचार्या श्रीमती एन.डी.राऊत मॅम व सत्कारमुर्ती आदरणीय जि.के.झा सर. माजी प्राचार्य, आ.टि.एस. बोंबार्डे सर, आ. पी.एम.गहाने सर, आ. डि.एस.मेश्राम सर, आ. रवि पाठक सर, आ. एम.पी.पवार सर, आ.डाॅ.यु.एम.पवार मॅम, आ.एस.के.थानथराटे मॅम, आ. एस.ओ.रहांगडाले मॅम, आ. के.टि.बिसेन सर, या सर्वांचे शाल -श्रीफळ देऊन उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे हस्ते सत्कार करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.सुरेंद्र खोब्रागडे व डाॅ.विनोद कोटांगले यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री प्रदिप कटरे यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी 1991 च्या बॅचचे विद्यार्थी राजेश्वर ऊर्फ संजय बहेकार, डाॅ.सुरेंद्र खोब्रागडे, लक्ष्मीकांत चन्नेकर, डाॅ.शैलेंद्र पटेल, रामेश्वर श्यामकुवर, प्रदिप कटरे, डाॅ.विनोद कोटांगले, शोभेंद्र वाढई, महादेव हटवार, महेंद्र बिसेन, मनोज भालेकर, निलिमा हुमणे, सुजाता बोंबार्डे, मनिषा शहारे, डाॅ.तुषार बोपचे, मेघश्याम पटले, हिवराज पारधी, प्रकाश राऊत, श्यामशंकर बघेले,संजय कान्हेकर, संतोष देशकर, संजय सवालाखे, हिवराज रंगारी, राजकुमार उंदिरवाडे, प्रदीप शहारे, चंद्रशेखर मानकर , मनोहर देशकर, अनिल शेंडे. रविंद्र नागरीकर यांनी सहकार्य केले.



ليست هناك تعليقات:
إرسال تعليق