आमगाव पोलिसांचे शानदार यश - बेकायदेशीरपणे दारू तस्करी करताना ३५ पेट्या आणि वाहन जप्त!
शहरातील जगनाडे चौकात कारवाई
🖋️ मनोज भालेकर प्रतिनिधी
🖋️ मनोज भालेकर प्रतिनिधी
परित्राण पाठाने युवा पिढीवर संस्कार घडतात -भंते संघपाल
परित्राण पाठाने युवा पिढीवर संस्कार घडतात प्रत्येकाने आपल्या घरी परित्राण पाठ ठेवून किंवा बुद्ध विहारात प्रत्येक रविवारी जाऊन मुला बाळासह कुटुंब जाऊन परित्राण पाठाचे अध्ययन करावे त्याने येणाऱ्या पिढीवर संस्कार घडतात असे प्रतिपादन भंते संघपाल यांनी पत्रकार संतोष तोताराम दांडगे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त ठेवण्यात आलेल्या बुद्ध पूजा व परित्राण पाठ प्रसंगी प्रवचनातून सांगितले .
यावेळी पत्रकार सतीश दांडगे यांचे मोठे बंधू कालकतीत संतोष दांडगे यांच्या चौथ्या स्मृतीदिना निमित्त घरी ठेवण्यात आलेल्या बुद्ध पूजा व परित्राण पाठ प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना भंते संघपाल म्हणाले की हा वर्षवासाचा महिना सुरू आहे यामध्ये उपवास व प्रत्येक बुद्ध विहारांमध्ये बुद्ध आणि त्याच्या धम्माचे पठण सुरू असतात त्या ठिकाणी परिवारासह जाऊन ऐका याने परिवारामध्ये परिवर्तन घडत असते .
त्यावेळी शोभाबाई दांडगे, पत्रकार सतीश दांडगे, पत्रकार उल्हास शेगोकार, माजी नगरसेविका सुमनताई इंगळे, रजनीताई शेगोकार,ज्योती दांडगे, सिद्धार्थ इंगळे, देविदास इंगळे, अजय तायडे ,मुकेश सुरवाडे, प्रणय इंगळे,रोहित दांडगे,प्रथमेश दांडगे,तक्षक दांडगे, तथा धम्म उपासक उपासिका तथा बाल बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मलकापूर प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मलकापूर येथे दिनांक 12/ 7/ 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता भारतीय जनता युवा मोर्चाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येशी यांच्या नेतृत्वात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते भाजप युवा मोर्चाच्या 13 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी प्रमुख उपस्थिती मलकापूर भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष अमोल भाऊ टप, भाजपा युवा नेते रविभाऊ वानखेडे, कामगार आघाडी शहराध्यक्ष अजय बघे, साहेबराव खराटे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष sc सेल आकाश भाऊ गोरे, ओम टप,देविन टाक, किशन सोनवणे ,आनंद निधाने, राम बैरागी, प्रशांत पाटील, रवी पाटील, गजानन निंबाळकर, विकास गोरे, गोलू वाकोडे, विशाल ठाकूर,सागर तायडे, विशाल पाटील,ई. युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
धानाच्या बोनस आणि चुकार्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...