मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

‏إظهار الرسائل ذات التسميات महिला. إظهار كافة الرسائل
‏إظهار الرسائل ذات التسميات महिला. إظهار كافة الرسائل

الخميس، 6 أكتوبر 2022

हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे नवरात्रीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या मातृशक्ती सन्मान सोहळ्यात पोलीस दलातील नारीशक्तींचा सन्मान

 

मलकापूर प्रतिनिधी

  मातृशक्तीच्या उपासनेचे पर्व म्हणजेच नवरात्रोत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जात आहे.या पर्वामध्ये नारीशक्तीचे पूजन करून उपासना करण्यात येते. भारतीय संस्कृतीच्या उदय कालापासूनच मातृ शक्तीचे किती अगाध व मोठे स्थान आपल्याला लाभलेले आहे हे या उत्सवा मधून प्रतीत होत असते. म्हणूनच हिंदी मराठी पत्रकार संघ मलकापूर नेहमी सामाजिक कार्याला केंद्रबिंदू मानून त्यानुसार कार्यरत आहे. 

  त्याचाच एक भाग म्हणून नवरात्रोत्सवानिमित्त या मातृशक्तींचे, नारीशक्तींचे सन्मान रुपी पूजन व्हावे म्हणून विविध क्षेत्रात आपले कार्यरुपी योगदान देणाऱ्या नारीशक्तींचा सन्मान गत सप्ताहभरात सुरू असून आज दि. 1/10/2022 रोजी जनतेच्या रक्षणासाठी म्हणजेच "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" या ब्रीद वाक्याच्या पदपथावर कार्यरत असणाऱ्या म्हणजेच पोलीस दलामध्ये सेवा देणाऱ्या नारीशक्तींचा हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर यांच्याकडून मलकापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या पीएसआय स्मिता म्हसाय मॅडम व पोलीस कॉ.श्रीमती वाढेमॅडम यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देत सन्मान रुपी सत्कार करण्यात आला. 

  यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर,  विदर्भ सचिव सतिष दांडगे,जिल्हाध्यक्ष गौरव खरे,  महासचिव करण सिंग,  तालुका संपर्क प्रमुख धर्मेशसिंह राजपूत,शहर संघटक योगेश सोनवणे, प्रा.प्रकाश थाटे,प्रमोद हिवराळे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

الثلاثاء، 19 يوليو 2022

परित्राण पाठाने युवा पिढीवर संस्कार घडतात -भंते संघपाल


परित्राण पाठाने युवा पिढीवर संस्कार घडतात -भंते संघपाल


  परित्राण पाठाने युवा पिढीवर संस्कार घडतात प्रत्येकाने आपल्या घरी परित्राण पाठ ठेवून किंवा बुद्ध विहारात प्रत्येक रविवारी जाऊन मुला बाळासह कुटुंब जाऊन परित्राण पाठाचे अध्ययन करावे त्याने येणाऱ्या पिढीवर संस्कार घडतात असे प्रतिपादन भंते संघपाल यांनी पत्रकार संतोष तोताराम दांडगे  यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त ठेवण्यात आलेल्या बुद्ध पूजा व परित्राण पाठ प्रसंगी प्रवचनातून सांगितले .

  यावेळी पत्रकार सतीश दांडगे यांचे मोठे बंधू कालकतीत संतोष दांडगे यांच्या चौथ्या स्मृतीदिना निमित्त घरी ठेवण्यात आलेल्या बुद्ध पूजा व परित्राण पाठ प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना भंते संघपाल म्हणाले की हा वर्षवासाचा महिना सुरू आहे यामध्ये उपवास व प्रत्येक बुद्ध विहारांमध्ये बुद्ध आणि त्याच्या धम्माचे पठण सुरू असतात त्या ठिकाणी  परिवारासह जाऊन ऐका याने परिवारामध्ये परिवर्तन घडत असते .



  त्यावेळी शोभाबाई दांडगे, पत्रकार सतीश दांडगे, पत्रकार उल्हास शेगोकार, माजी नगरसेविका सुमनताई इंगळे, रजनीताई शेगोकार,ज्योती दांडगे, सिद्धार्थ इंगळे, देविदास इंगळे, अजय तायडे ,मुकेश सुरवाडे, प्रणय इंगळे,रोहित दांडगे,प्रथमेश दांडगे,तक्षक दांडगे, तथा धम्म उपासक उपासिका तथा बाल बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

السبت، 16 يوليو 2022

आ. मा. श्री. राजूभाऊ एकडे यांच्या वाढदिवसा निमित्त्याने आज हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार

  

   मलकापूर - मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. राजूभाऊ  एकडे यांच्या वाढदिवसा निमित्त्याने आज  हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला .

   यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे  धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र अध्यक्ष , अजय टप विदर्भ प्रसिद्धीप्रमुख,  सतीश दांडगे विदर्भ सचिव, नथुजी हिवराळे , करणसिंग सिरसवाल,  अनिल गोठी तालुका उपाध्यक्ष, नागेश सुरंगे जिल्हा संपर्क प्रमुख, श्रीकृष्ण शहर सचिव,  अनिल झनके तालुका संपर्क प्रमुख , प्रदीप इंगळे तालुका संघटक, योगेश सोनवणे शहर सहसंघटक आदी मान्यवर उपस्थित होते.

अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द

धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल

 धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...