मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

السبت، 14 يونيو 2025

पोलीस स्टेशन रावणवाडी पोलिसांची उत्कृष्ट कारवाई.... एकास अग्निशस्त्रसह घेतले ताब्यात... गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन रावणवाडी  पोलिसांची उत्कृष्ट कारवाई....  एकास अग्निशस्त्रसह घेतले ताब्यात... गुन्हा नोंद 


🖊️ मनोज भालेकर प्रतिनिधी 

 गोंदिया : दिनांक १४/०६/२०२५ चे १२/४८ वा.  पोलीस स्टेशन रावणवाडी येथील अधिकारी व अंमलदार हे  पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय बातमी दाराकडुन खात्रीशिर बातमी मिळाली की, मौजा मंगरुटोला (लंबाटोला) ते पांजरा गावाकडे जाणा-या कच्चा रसत्यावर एक इसम हा स्वत: जवळ पांढ-या पिशवित गावठी कट्टा बाळगुन फिरत आहे. अशा मुखबीर च्या खबरे वरुन मंगरुटोला शिवारातुन मंगरुटोला ते पांजरा जाणा-या कच्चा रोडयावर पोलीस स्टेशन रावणवाडी येथील अधिकारी व अंमलदार गेले असता सदर ठिकाणी एक ईसम पांढ-या रंगाची पिशवी घेवून फिरतानी मिळुन आला त्यास ताब्यात घेऊन थांबवुन त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव राजु हिरालाल मेश्राम वय ४२ रा. मंगरुटोला (लंबाटोला) ता.जि. गोंदिया असे सांगीतले. त्याची पंचासमक्ष झळती घेण्यात आली  असता राजु हिरालाल मेश्राम याचे ताब्यात असलेल्या पांढ-या रंगाचा पिश्वीत एक लोखंडी थातुची पिस्तुल सारखा दिसणारा एक गावठी कट्टा, (अग्नीशस्त्र) ज्याला एक लोखंडी मुठ असुन समोर लोखंडी बॅरल (नली) असुन लोखंडी बॉडी असलेला ज्याला दोन ट्रिगर अंदाजे  किमती  १५०००/ रु. चा माल मिळुन आला. त्यास सदर गावठी कट्टा कुठुन आणले याबाबत विचारणा केली असता त्याने कोणतेही समाधानकार उत्तर दिलेले नाही. पंचासमक्ष आरोपीच्या ताब्यातुन एक लोखंडी गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) अंदाजे किमती 15000/-रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.  त्याचे विरुद्ध  पो ठाणे रावणवाडी  अप क्रमांक  282/2025  भारतीय हत्यार कायदा चे कलम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई तपास प्रक्रिया सपोनि नावकार हे करीत आहेत.
       सदरची कामगीरी श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्रीमती रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शना खाली पोलीस स्टेशन रावणवाडी  चे पोलीस निरिक्षक श्री वैभव पवार, पोलीस उपनिरीक्षक पूजा जाधव, HC जगत बर्वे, HC गिरीष पांडे,PN सुशील मल्लेवार, PC बुराडे, लेकुरवाळे चालक HC खरबडे,  यांनी केली आहे.

ليست هناك تعليقات:

अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द

धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल

 धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...