मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

الجمعة، 20 يونيو 2025

आमगांव वनपरिक्षेत्रांतर्गत मौजा रामपुर गावालगत वावरत असलेल्या वाघास यशस्वीरित्या रेस्क्यू


आमगांव वनपरिक्षेत्रांतर्गत मौजा रामपुर गावालगत वावरत असलेल्या वाघास यशस्वीरित्या रेस्क्यू 


🖊️ तामेश्वर पंधरे 

आमगाव: २० जून २०२५ रोजी गोंदिया वनविभागांतर्गत आमगांव वनपरिक्षेत्रातील मौजा कवडी गावात वन्यप्राणी वाघ दिसून आल्याची माहिती प्राप्त होताच वनविभागाची संपूर्ण चमू घटनास्थळी दाखल होवून संपूर्ण परिसरात निरीक्षण करुन वाघाचा शोध घेतला असता दुपारी अंदाजे १२.३० वा. दरम्यान सदर वाघ आमगांव वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र अंजोरा नियतक्षेत्र अंजोरा मधील मौजा रामपुर गावाजवळील देवरी-आमगांव राष्ट्रीय महामार्गा लगत रोडच्या कडेल नालीमध्ये बसून असल्याचे दिसून आले.
सदर वाघ मागील ७ ते 8 दिवसापासून मानवी वस्ती तसेच शेती क्षेत्रा लगत फिरत असल्याने भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता मा. मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य यांच्या पुर्व परवानगीने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार गोंदिया वनविभागाचे जलद बचाव दल व क्षेत्रीय कर्मचारी यांचे कडुन सदर वाघास बेशुध्द करुन यशस्वीरित्या रेस्क्यू करण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित पशु वैद्यकीय अधिकारी यांचेकडुन वाघाची तपासणी करण्यात आली, तपासणीमध्ये वाघ सुदृढ असल्याचे निष्पन्न झाल्याने वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीने त्याला नैसर्गिक अधिवासात निसर्गमुक्त करण्यात आले.
सदरची मोहीम वनसंरक्षक (प्रादे) नागपूर वनवृत्त व उपवनसंरक्षक गोंदिया वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) गोंदिया, वनपरिक्षेत्र अधिकारी, आमगांव, वनपरिक्षेत्र अधिकारी, उत्तर देवरी, श्री सावन बहेकार, मानद वन्यजीव रक्षक तसेच अध्यक्ष सेवा संस्था गोंदिया, डॉ. शैलेंद्र पटेल, पशुधन विकास अधिकारी, डॉ. अजर्जीक्य उरकुडे, पशुधन विकास अधिकारी, श्री सचिन कोकोडे, पशुधन विकास अधिकारी, श्री कांतीलाल पटले, पशुधन विकास अधिकारी व क्षेत्रीय वनकर्मचारी यांचे उपस्थितीत यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.

ليست هناك تعليقات:

अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द

धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल

 धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...