पक्षीप्रेमी दिलीप कोकाटे यांनी दिले कबुतराला जीवदान
वडाला बांधलेल्या धाग्यात अडकला पाया
पनवेल/ प्रतिनिधी
वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडाला बांधलेल्या धाग्यात एका कबुतराचा पाय अडकून तो हालहाल करत होता. ही दुर्दशा पक्षीप्रेमी दिलीप कोकाटे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तिथे असलेल्या पुष्पा आवटे यांना सोबत घेऊन धागा सोडवला आणि त्या कबुतराला जीवदान दिले.
दिलीप कोकाटे यांनी संयम, काळजी आणि माया दाखवत कबुतराला सुरक्षितरीत्या मुक्त केले. नागरिकांनी त्यांच्या या कृत्याचे कौतुक केले असून, धार्मिक कार्य करताना निसर्ग आणि प्राणिमात्रांची काळजी घेण्याचे महत्त्वही या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق