🖊️ तामेश्वर पंधरे
आमगाव: सध्या वीज बिलात वाढ झाल्याने ग्राहक त्रस्त आणि या वाढीमुळे ग्राहकांची लुट होत असल्याचं मत व्यक्त होत आहे. वाढत्या महागाईने नागरिक हैराण झाले आहेत, त्यावर महावितरणने विज बिलात वाढ करून अतिरीक्त सुरक्षा रक्कम लाटून ग्राहकांना विजेचा झटका दिला आहे. तर दुसरीकडे आता महावितरण कडून पूर्व कल्पना नदेता विजेच्या खांबावर मीटर व घरगुती मीटर बदलविण्याचे काम चालु आहे. वीजविभाग सिक्युरिटी माध्यमातून दर वर्षी पैसे घेते अशा स्थितीत कुणाची आणि कोणती सुरक्षा ? असा प्रश्न उभा केला जात आहे.
आमगाव तालुक्यातील काही क्षेत्रामध्ये नियमित वीज बिल भरणा करणाऱ्या ग्राहकांच्या घरगुती विजेचा मीटर महावितरण वीज कंपन्याचे कार्यरत कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांकडून विज मीटर काढण्यात आले व त्या जागी नवीन मीटर बसविण्यात आले. पण वीज बिलात वाढ झाल्याने ग्राहक त्रस्त आणि या वाढीमुळे ग्राहकांची लुट होत असल्याचं मत व्यक्त होत आहे. ग्राहकाच्या कित्येक अशा समस्या आहेत की, त्यांचा कधीच निर्णय लागत नाही. जसे की, चुकीच्या बिलाची तक्रार करायला गेल्यास विज वितरण कंपनीचा "आधी वीज बिल भरा मग बघु"असा पवित्र असतो तक्रार नोंदवून ट्रांजकसन आयडी देऊन सुध्दा त्यांनीच दिलेला बिल बरोबर आहे असे समजले जाते.
महावितरण विभागातील कर्मचाऱ्यांच्या या वृत्तीबदल ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق