माल्ही शंभुटोला रस्ता लाखो रुपये खर्चुन सहा महिन्यात खराब
आमगाव: तालुक्यातील माल्ही शंभुटोला दोन गावाला जोडणारा रस्ता सहा महिन्यात खराब झाल्याचे निदर्शनात येत आहे. माल्ही शंभुटोला रस्ता ग्रामीण २० सा.क्र.०/०० ता. आमगाव कामाचे नाव असुन कार्यान्वित यंत्रणा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया अंतर्गत दिनांक २५/८/२०२४ ला काम सुरु झाल्याचा दिनांक आहे .माहिती तक्त्या वर काम पूर्ण झाल्याचा दिनांक उल्लेखही नाही. संपूर्ण सिमेंट काँक्रिट रस्ता निकृष्ट दर्जाचा असून अत्यंत अल्प प्रमाणात सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. रस्त्याच्या मधोमध मोठ मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असुन निकृष्ट दर्जाचा बांधकाम केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.या रस्त्याची तपासणी गुण नियंत्रण प्रयोगशाळे मार्फत केल्यास आणखी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.या ठिकाणी काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याचे जनावर खाली पाडले असता पायाला दुखापत झाली होती. असे प्रकार अनेकदा येथे घडत आहेत.लाखो रुपये खर्चून बांधलेला रस्ता सहा महिन्यात खराब झाला.ठेकेदारांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखोचा भ्रष्टाचार केला. या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. सदर अंतर्गत सिमेंट रस्त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.अन्यथा आंदोलन करू, असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. (वार्ताहर)

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق