मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

الثلاثاء، 26 يوليو 2022

हिवरखेड ता.खामगांव येथील ठाणेदारांनी पत्रकाराला दिले सुचना पत्र--ठाणेदारावर कारवाई ची हिंदी मराठी पत्रकार संघाची मागणी

  


 मलकापूर प्रतिनिधी \

    दैनिक सत्यप्रत ने ९ जुलै रोजी हिवरखेड पो.स्टे हिद्दीतील लाखनवाड्यात चालनार्या अवैध वरली मटका जुगाराची बातमी छापली होती म्हणून चिडून जाऊन हिवरखेड ठाणेदार वाघ यांनी दैनिक सत्यप्रत ला गैरकायदेशीरपने सुचनापत्र पाठवले होते. त्या संदर्भात आज मलकापूर येथे हिंदी मराठी पत्रकार संघाचे वतीने मा. उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक व  मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

    या निवेदनात म्हंटले आहे की खामगांव येथील दैनिक सत्यप्रत चे मुख्य संपादक आनंद प्रकाश गायगोळ यांनी दि. ९ जुलै २०१२ रोजी त्यांच्या वृत्तपत्रात लाखनवाडा येथे  वरली मटका जुगार ची बातमी प्रसिध्द केला होती. मात्र ठाणेदार वाघ यांनी त्या जुगार अड्यावर कारवाई करण्याऐवजी संपादक आनंद गायगोळ यांना वेठीस धरून त्यांना सूचनापत्र पाठवुन त्या बातमीचा जाब विचारण्या करीता दि. १८ जुलै २०१२ रोजी सकाळी ११.०० वाजता पोलिस स्टेशन हिवरखेड येथे न चुकता हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

    ठाणेदार गजानन वाघ हे त्यांच्या पदाचा गैरवापर करून आमच्या पत्रकारावर दबाव टाकण्याचा व त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार करत आहे. कायदा हातात घेवून कोणताही अधिकारी पत्रकाराला धमकाविण्याचा प्रयत्न करू शकत नाही. किंवा त्यांच्या लिखानावर गदा आनु शकत नाही. अवैध व्यवसाय सुरू असेल आणि  त्यांच्या बातम्या पत्रकार प्रसिद्ध करत असेल आणि पोलीस प्रशासन त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असेल तर   हिंदी मराठी पत्रकार संघ  लोकशाही मार्गाने आंदोलन  केले जाईल .

    या प्रकरणात वरिष्ठ अधिकार्‍यानी लक्ष घालून हिवरखेड पोलिस स्टेशन चे ठाणेदार गजानन वाघ यांना पत्रकारावर सुड बुद्धीने केलेल्या कारवाई बद्दल समज द्यावी अशी मागणी हिंदी मराठी संघातर्फे करण्यात आली . यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील, श्रीकृष्ण तायडे विदर्भ समन्वयक, सतिष दांडगे विदर्भ सचिव, अजय टप विदर्भ संपर्कप्रमुख, गौरव खरे जिल्हाध्यक्ष, उल्हासभाई शेगोकार तालुकाध्यक्ष, प्रा.कृष्णा मेसरे जिल्हा प्रवक्ता, स्वप्निल आकोटकर जिल्हा सचिव, नागेश सुरंगे जिल्हा संपर्कप्रमुख, अनिल गोठी तालुका उपाध्यक्ष, कैलास काळे तालुका प्रसिद्धीप्रमुख, धर्मेशसिंह राजपूत तालुका संपर्कप्रमुख, करण झनके तालुका संघटक, प्रदीप इंगळे सह संपर्कप्रमुख, श्रीकृष्ण भगत शहर सचिव, योगेश सोनोने सह संघटक,  विनायक तळेकर सहसचिव, प्रा. प्रकाश थाटे कोषाध्यक्ष, अपरेश तुपकरी, एन.के.हिवराळे, पंकज मोरे इत्यादी सह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.


 

السبت، 23 يوليو 2022

अतीरुष्टि मुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाचे शेतकऱ्यांच्या बाधावर जाऊन पंचनामे करा स्वाभिमीनीची मागणी.


या खरीपा मध्ये पाऊस चांगला असल्याचे हवामान खातेने दिलेल्या अंदाजा नुसार शेतकऱ्यांनी या वेळेस मिरगाची पेरणी केली व पहिल्याच पावसात शेती पेरायाला सुरवात केली. परंतु पाहिजे तसा पाऊस न झाल्याने दुबार-तिबार पेरणीने संकट शेतकऱ्यांन वर आले.परंतु नंतर महाराष्ट्र भारत पावसाने जो थेमान घेतला त्यात शेगाव तालुका ही सुटला नसल्याने परिणामी चागलाच पाऊस या ठिकाणी झाला आहे व त्या मुळे शेतकऱ्यांची बरीसशी शेती प्रभावीत झाली असून. शेती लागत च्या गावामध्ये ही मोठया प्रमाणात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे.घरात पाणी शिरलायाने अन्नधान्य समेत संसार उपयोगी साहित्य ही या पाण्यात भाजून गेले असलेल्याने शेतकरी, शेतमजूर नागरिक हतभल झाला आहे. त्याच बरोबर अतिवृष्टी शेतकऱ्यांची शेती जमीन खरडून गेल्याने शेतकरी शासनाकडे अशेच्या नजरेने पाहत आहे. आदीच सुलतानी कचाट्यात अळकलेला शेतकरी आसमानी कहरा मुळे हवालदिल झाला आहे. अतिरुष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेल्या नुकसानीचे  त्वरित पंचनामे करावे  नुस्ते कागदावरील पंचनामे न करता शेतकऱ्यांच्या बांधावर जाववून पंचनामे करावे तेव्हाच त्यांच्या  नुकसानाचे प्रमाण कळेल आणि शेतकऱ्यांना शासन स्तरावर आर्थिक मदत मिळेल अश्या तऱ्हेचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर तालुका अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या कडून देण्यात आले असून शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे शासनाच्या कडून भरीव मदत मिळावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून शेतकऱ्यांच्या न्याय हक्का करिता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.

الثلاثاء، 19 يوليو 2022

विद्याधर महाले यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव

प्रतिनिधी नागेश सुरंगे

प्रशासकीय व मंत्रालयीन कामाचा दांडगा अनुभव असणारे विद्याधर दयासागर महाले यांची, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव म्हणून नव्या सरकारमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते चिखलीच्या भाजप आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांचे पतीही आहेत.

विद्याधर महाले हे उच्चशिक्षित असून, स्पर्धा परीक्षेतून आधी त्यांची जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्ग २ पदावर नियुक्ती झाली होती. नंतर ते विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते ना. भाऊसाहेब फुंडकर यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्त झाले व तेव्हापासून त्यांनी मुंबई व मंत्रालयीन कामात चांगलाच जम बसवला.

विनोद तावडे यांच्याकडे आधी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेत्यांचे त्याचे खाजगी सचिव व नंतर शालेय शिक्षण मंत्राचे सचिव म्हणून त्यांनी काम केले. युती सरकारच्या काळात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडेही ते होते. सत्तापालट झाल्यावर पुन्हा ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे आले, व आता परत भाजपा सत्तेत येताच उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खाजगी सचिव म्हणून नियुक्ती दिली आहे. त्यांच्या या नियुक्तीने विशेषतः चिखली मतदारसंघासह बुलडाणा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

Tags:

आपला महाराष्ट्र आपला जिल्हा

विशेष

परित्राण पाठाने युवा पिढीवर संस्कार घडतात -भंते संघपाल

परित्राण पाठाने युवा पिढीवर संस्कार घडतात

मलकापूर प्रतिनिधी 19/7/22  परित्राण पाठाने युवा पिढीवर संस्कार घडतात प्रत्येकाने आपल्या घरी परित्राण पाठ ठेवून किंवा बुद्ध विहारात प्रत्येक रविवारी जाऊन मुला बाळासह कुटुंब जाऊन परित्राण पाठाचे अध्ययन करावे त्याने येणाऱ्या पिढीवर संस्कार घडतात असे प्रतिपादन भंते संघपाल यांनी पत्रकार संतोष तोताराम दांडगे  यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त ठेवण्यात आलेल्या बुद्ध पूजा व परित्राण पाठ प्रसंगी प्रवचनातून सांगितले यावेळी पत्रकार सतीश दांडगे यांचे मोठे बंधू कालकतीत संतोष दांडगे यांच्या चौथ्या स्मृतीदिना निमित्त घरी ठेवण्यात आलेल्या बुद्ध पूजा व परित्राण पाठ प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना भंते संघपाल म्हणाले की हा वर्षवासाचा महिना सुरू आहे यामध्ये उपवास व प्रत्येक बुद्ध विहारांमध्ये बुद्ध आणि त्याच्या धम्माचे पठण सुरू असतात त्या ठिकाणी  परिवारासह जाऊन ऐका याने परिवारामध्ये परिवर्तन घडत असते त्यावेळी शोभाबाई दांडगे, पत्रकार सतीश दांडगे, पत्रकार उल्हास शेगोकार, माजी नगरसेविका सुमनताई इंगळे, रजनीताई शेगोकार,ज्योती दांडगे, सिद्धार्थ इंगळे, देविदास इंगळे, अजय तायडे ,मुकेश सुरवाडे, प्रणय इंगळे,रोहित दांडगे,प्रथमेश दांडगे,तक्षक दांडगे, तथा धम्म उपासक उपासिका तथा बाल बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ली.भो.चांडक विद्यालयात विद्यार्थ्यांना करोना प्रतिबंधक लस!

 


  चांडक विद्यालय मलकापूर येथे विद्यार्थ्यांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली .इयत्ता सातवी तील विद्यार्थिनी अपर्णा शेगोकार लस घेतली .
  यावेळी प्रामुख्याने चांडक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर सर,अशोक महाजन सर,आरोग्य सेविकाअश्विनी मॅडम, वैशाली सावळे,आशा वर्कर रुपाली येवतकर रेखा अनसुने ,वर्षा पाटिल, हर्ष वाकेकर आदी उपस्थित होते

परित्राण पाठाने युवा पिढीवर संस्कार घडतात -भंते संघपाल


परित्राण पाठाने युवा पिढीवर संस्कार घडतात -भंते संघपाल


  परित्राण पाठाने युवा पिढीवर संस्कार घडतात प्रत्येकाने आपल्या घरी परित्राण पाठ ठेवून किंवा बुद्ध विहारात प्रत्येक रविवारी जाऊन मुला बाळासह कुटुंब जाऊन परित्राण पाठाचे अध्ययन करावे त्याने येणाऱ्या पिढीवर संस्कार घडतात असे प्रतिपादन भंते संघपाल यांनी पत्रकार संतोष तोताराम दांडगे  यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त ठेवण्यात आलेल्या बुद्ध पूजा व परित्राण पाठ प्रसंगी प्रवचनातून सांगितले .

  यावेळी पत्रकार सतीश दांडगे यांचे मोठे बंधू कालकतीत संतोष दांडगे यांच्या चौथ्या स्मृतीदिना निमित्त घरी ठेवण्यात आलेल्या बुद्ध पूजा व परित्राण पाठ प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना भंते संघपाल म्हणाले की हा वर्षवासाचा महिना सुरू आहे यामध्ये उपवास व प्रत्येक बुद्ध विहारांमध्ये बुद्ध आणि त्याच्या धम्माचे पठण सुरू असतात त्या ठिकाणी  परिवारासह जाऊन ऐका याने परिवारामध्ये परिवर्तन घडत असते .



  त्यावेळी शोभाबाई दांडगे, पत्रकार सतीश दांडगे, पत्रकार उल्हास शेगोकार, माजी नगरसेविका सुमनताई इंगळे, रजनीताई शेगोकार,ज्योती दांडगे, सिद्धार्थ इंगळे, देविदास इंगळे, अजय तायडे ,मुकेश सुरवाडे, प्रणय इंगळे,रोहित दांडगे,प्रथमेश दांडगे,तक्षक दांडगे, तथा धम्म उपासक उपासिका तथा बाल बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

السبت، 16 يوليو 2022

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

  

मलकापूर प्रतिनिधी 

    भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मलकापूर येथे दिनांक 12/ 7/ 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता भारतीय जनता युवा मोर्चाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येशी यांच्या नेतृत्वात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते भाजप युवा मोर्चाच्या 13 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

     त्यावेळी प्रमुख उपस्थिती मलकापूर भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष अमोल भाऊ टप, भाजपा युवा नेते रविभाऊ वानखेडे, कामगार आघाडी शहराध्यक्ष अजय बघे, साहेबराव खराटे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष sc सेल आकाश भाऊ गोरे,  ओम टप,देविन टाक, किशन सोनवणे ,आनंद निधाने,  राम बैरागी, प्रशांत पाटील, रवी पाटील, गजानन निंबाळकर, विकास गोरे, गोलू वाकोडे, विशाल ठाकूर,सागर तायडे, विशाल पाटील,ई. युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


हिंदी - मराठी पत्रकार संघाच्या मोताळा तालुका अध्यक्ष पदी सॅंडीभाऊ मेढे तर उपाध्यक्षपदी गणेश वाघ

  




मोताळा प्रतिनिधी :- 

पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे सॅंडीभाऊ मेढे यांची हिंदी मराठी पत्रकार संघाच्या मोताळा तालुकाध्यक्ष पदी तर उपाध्यक्षपदी गणेश वाघ यांची नियुक्ती करण्यात आली.सदर निवड तळागळातील शोषित,पिडित,वंचितांना न्याय मिळवून द्यावा हीच आशा बाळगत निवड करण्यात आली आहे तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली. मोताळा येथील पत्रकार  क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे  संदेश मेढे  यांची तालुका अध्यक्ष तर गणेश वाघ यांची तालुका उपाध्यक्ष हिंदी-मराठी पत्रकार संघटने च्या  पदी निवड करण्यात आली आहे.सदर निवड महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहाल व सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आशा बाळगत सदर निवड करण्यात आली आहे.

तर   महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली त्यावेळी ,  उल्हास शेगोकार तालुकाध्यक्ष,   अजय टप विदर्भ प्रसिद्धी प्रमुख,सतीश दांडगे विदर्भ सचिव, श्रीकृष्ण तायडे विदर्भ समन्वयक,  गौरव खरे जिल्हाध्यक्ष , कृष्णा मेसरे जिल्हा प्रवक्ता, स्वप्निल आकोटकर जिल्हा सचिव , नागेश सुरंगे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख , अनिल गोठी तालुका उपाध्यक्ष, श्रीकृष्ण भगत तालुका सचिव , 
शेख निसार सह संघटक,करण झनके तालुका संघटक,  कैलास काळे प्रसिद्धीप्रमुख तालुका,
विनायक तळेकर शहर सहसचिव,
 योगेश कुमार सोनवणे शहर सह संघटक, धर्मेश सिंह राजपूत संघटक , अनिल धनके शहर संपर्कप्रमुख, प्रदीप इंगळे संपर्कप्रमुख, प्रा प्रकाश थाटे, प्रमोद हिवराळे  हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देऊन  निवड करण्यात आली आहे.

सदर निवडीबद्दल संदेश मेढे व गणेश वाघ यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आ. मा. श्री. राजूभाऊ एकडे यांच्या वाढदिवसा निमित्त्याने आज हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार

  

   मलकापूर - मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. राजूभाऊ  एकडे यांच्या वाढदिवसा निमित्त्याने आज  हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला .

   यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे  धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र अध्यक्ष , अजय टप विदर्भ प्रसिद्धीप्रमुख,  सतीश दांडगे विदर्भ सचिव, नथुजी हिवराळे , करणसिंग सिरसवाल,  अनिल गोठी तालुका उपाध्यक्ष, नागेश सुरंगे जिल्हा संपर्क प्रमुख, श्रीकृष्ण शहर सचिव,  अनिल झनके तालुका संपर्क प्रमुख , प्रदीप इंगळे तालुका संघटक, योगेश सोनवणे शहर सहसंघटक आदी मान्यवर उपस्थित होते.

अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द

धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल

 धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...