मलकापूर प्रतिनिधी \
या निवेदनात म्हंटले आहे की खामगांव येथील दैनिक सत्यप्रत चे मुख्य संपादक आनंद प्रकाश गायगोळ यांनी दि. ९ जुलै २०१२ रोजी त्यांच्या वृत्तपत्रात लाखनवाडा येथे वरली मटका जुगार ची बातमी प्रसिध्द केला होती. मात्र ठाणेदार वाघ यांनी त्या जुगार अड्यावर कारवाई करण्याऐवजी संपादक आनंद गायगोळ यांना वेठीस धरून त्यांना सूचनापत्र पाठवुन त्या बातमीचा जाब विचारण्या करीता दि. १८ जुलै २०१२ रोजी सकाळी ११.०० वाजता पोलिस स्टेशन हिवरखेड येथे न चुकता हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
ठाणेदार गजानन वाघ हे त्यांच्या पदाचा गैरवापर करून आमच्या पत्रकारावर दबाव टाकण्याचा व त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार करत आहे. कायदा हातात घेवून कोणताही अधिकारी पत्रकाराला धमकाविण्याचा प्रयत्न करू शकत नाही. किंवा त्यांच्या लिखानावर गदा आनु शकत नाही. अवैध व्यवसाय सुरू असेल आणि त्यांच्या बातम्या पत्रकार प्रसिद्ध करत असेल आणि पोलीस प्रशासन त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असेल तर हिंदी मराठी पत्रकार संघ लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल .
या प्रकरणात वरिष्ठ अधिकार्यानी लक्ष घालून हिवरखेड पोलिस स्टेशन चे ठाणेदार गजानन वाघ यांना पत्रकारावर सुड बुद्धीने केलेल्या कारवाई बद्दल समज द्यावी अशी मागणी हिंदी मराठी संघातर्फे करण्यात आली . यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील, श्रीकृष्ण तायडे विदर्भ समन्वयक, सतिष दांडगे विदर्भ सचिव, अजय टप विदर्भ संपर्कप्रमुख, गौरव खरे जिल्हाध्यक्ष, उल्हासभाई शेगोकार तालुकाध्यक्ष, प्रा.कृष्णा मेसरे जिल्हा प्रवक्ता, स्वप्निल आकोटकर जिल्हा सचिव, नागेश सुरंगे जिल्हा संपर्कप्रमुख, अनिल गोठी तालुका उपाध्यक्ष, कैलास काळे तालुका प्रसिद्धीप्रमुख, धर्मेशसिंह राजपूत तालुका संपर्कप्रमुख, करण झनके तालुका संघटक, प्रदीप इंगळे सह संपर्कप्रमुख, श्रीकृष्ण भगत शहर सचिव, योगेश सोनोने सह संघटक, विनायक तळेकर सहसचिव, प्रा. प्रकाश थाटे कोषाध्यक्ष, अपरेश तुपकरी, एन.के.हिवराळे, पंकज मोरे इत्यादी सह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق