मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

الجمعة، 1 أغسطس 2025

स्मार्ट मीटरच्या वाढत्या बिलांवर आमदार विनोद अग्रवाल यांचा पुढाकार, बिल दुरुस्ती मोहीम राबविण्याची मागणी

स्मार्ट मीटरच्या वाढत्या बिलांवर आमदार विनोद अग्रवाल यांचा पुढाकार, बिल दुरुस्ती मोहीम राबविण्याची मागणी

गोंदिया प्रतिनिधी 

गोंदिया/३१ जुलै: स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज ग्राहकांच्या बिलांमध्ये अचानक आणि मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पूर्वी ज्या ग्राहकांचे मासिक बिल ₹६००-₹७०० पर्यंत येत होते, तेच बिल आता ₹३,०००-₹४,००० पर्यंत पोहोचले आहे. या गंभीर समस्येवर आमदार विनोद अग्रवाल यांनी वीज विभागाला पत्र लिहून नागरिकांच्या समस्यांची त्वरित दखल घेऊन बिल दुरुस्ती मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. ज्यामध्ये आमदार विनोद अग्रवाल यांनी प्रमुख मागण्या केल्या आहेत की आठवड्यातून काही दिवस उपविभाग स्तरावर विशेष बिल दुरुस्ती मोहीम राबवावी. या नियोजित दिवसांमध्ये फक्त वाढलेल्या वीज बिलांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. मोहिमेची पूर्व माहिती सोशल मीडिया आणि स्थानिक वर्तमानपत्रांद्वारे नागरिकांना देण्यात यावी, जेणेकरून सर्व बाधित ग्राहकांना वेळेवर फायदा घेता येईल.


आमदार विनोद अग्रवाल यांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्याशी बोलताना सांगितले की, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिलांमध्ये अनेक पटीने वाढ झाल्याची तक्रार नागरिक त्यांच्या कार्यालयात सतत करत आहेत. विभागीय कार्यालयात जाऊनही योग्य तोडगा निघत नाही. जर तातडीने पावले उचलली गेली नाहीत तर नागरिकांचा रोष वाढू शकतो. आमदार विनोद अग्रवाल जी यांनी वीज विभागाला तातडीने कारवाई करून जनहिताचे निर्णय घेण्याची आणि बिल दुरुस्ती मोहिमेच्या तारखांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

ليست هناك تعليقات:

अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द

धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल

 धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...