मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

الأحد، 1 يونيو 2025

गजेंद्र चंदनसिंग बसिने कृषी क्षेत्रात इंडियन एक्सेलंन्स अवॉर्ड ने सन्मानित

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मलकापूर येथे इंडियन एक्सलन्स अवॉर्ड   संपन्न

महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला.

🖊️ तामेश्वर पंधरे मुख्यसंपादक 

गोंदिया: दैनिक अहिल्याराज व हिंदी मराठी पत्रकार संघ पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती व दैनिक अहिल्या राज वर्धापन दिवस निमित्ताने विविध क्षेत्रातील  कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन एक्सएलन्स अवार्ड 2025 चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवण्यात आले होते
त्यावेळी  700 प्रस्तावांपैकी निवड करून 260  मान्यवरांना इंडियन एक्सलन्स पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. 
इंडियन एक्सलन्स अवार्ड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजूभाऊ काजळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर हे होते कार्यक्रमाचे उद्घाटक धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ हे होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी  म्हणून निलेश तायडे सहा माहिती आयुक्त मंत्रालय मुंबई, संदीप काळे ठाणेदार मलकापूर ग्रामीण, भाई अशांत वानखेडे संस्थापक समतेचे निळे वादळ,    प्रसादभाऊ जाधव राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब दामोदर उद्योजक,  प्रा. डॉ. अनिल खर्चे सर प्राचार्य इंजिनिअरिंग व्ही. भी. कोलते इंजीनियरिंग कॉलेज, फारुख शेख ज्येष्ठ पत्रकार लोकमत,  पत्रकार होते.
कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. 
कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक ,राजकीय ,कला, वैद्यकीय, वकील, कृषी , उद्योजक अशा अनेक क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सत्कार इंडियन एक्सएलन्स अवार्ड 2025 देऊन करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील गजेंद्र चंदनसिंग बसिने यांनी महाराष्ट्रात कृषि क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी सामाजिक क्षेत्रातील कार्यक्रमात सहभागी होउन ,शेती विषयी माहिती देणे उदा.बियाणे कोणते वापरावे,खते केव्हा वापरायचे,औषधी कोणती वापरायचे यांची माहिती देणे ,राजकीय विषयावर चर्चा करणे,कृषी क्षेत्रातील समस्याच्या विचारांची देवाणघेवाण करून, 
पीकावर असणारे रोग,पिकाविषयी असणारी समस्यावर चर्चा करुण तोडगा काढणे व रोगावर कोणते किटकनाशके फवारा करायचा ते सांगणे.अशा अनेक समस्या वर चर्चा करून उपाय योजना करून शेतकऱ्यांना जैविक शेती कडे वळवून शेतकऱ्यांची शेती नापीक होण्यापासून बचाव केले याबद्दल कृषि क्षेत्रात इंडियन एक्सेलंन्स अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
यावेळी देशासाठी आपल्या प्राणाची परवा न करता देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
   

ليست هناك تعليقات:

अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द

धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल

 धानाच्या बोनस आणि चुकार्‍यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...