मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने
السبت، 6 مايو 2023
भजियापार ग्राम पंचायत प्रकरणी ग्रामसेवक, खंडविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मिलीभगत
आमगाव: ग्राम पंचायत भजियापार चा भ्रष्टाचार दिंनाक 23 नोव्हे.021 ला उघड करण्यात आला होता. त्याकाळात ग्रामसेवक भुमके व सरपंच जियालाल पटले होते.23 नोव्हे.021 च्या ग्रामसभेत ग्रामसेवक, सरपंच व पदाधिकरी
यांनी कबूल केले की आम्ही भ्रष्टाचार केले आहे. त्यावर ग्रामसभेच्या बाकी विषयावर चर्चा करण्यात आली पण ग्रामसेवकांच्या शहनपणामुळे ग्रामसभा संपली नाही. त्यावर ग्रामस्थांनी आक्रोश दाखवीत ग्राम पंचायत ला कुलुप ठोकले. त्यावर ग्राम पंचायत दोन दिवस बंद राहिली असता. सदर प्रकरण प्रभारी खंडविकास अधिकारी के. एम. रहांगडाले यांना चौकशी करीता ग्रामस्थांनी विनंती अर्ज सादर केले. व प्रकरणाची विस्तृत माहिती देण्यात आली. खडविकास अधिकारी च्या म्हणण्यावर ग्राम पंचायत चा कुलूप खंडविकासअधिकारी समक्ष उघडण्यात आले. पण सदर प्रकरणावर खंडविकास अधिकारी ने चौकशी नकेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आक्रोश निर्माण झाले. व गावकऱ्यांच्या सहकार्याने चौकशी नझाल्यामुळे बेमुदत आमरण उपोषण बसण्याची व्यवस्था करण्यात आली. व 2 एप्रिल 2022 ला नरेंद्र रहांगडाले व रामेश्वर पंधरे हे दोन व्यक्ती आमरण उपोषणाला बसले.5 एप्रिल 2022 ला उपोषण कर्त्याची सांगता करण्याकरिता तहसीलदार आमगाव, खंडविकास अधिकारी पंचायत समिती आमगाव, पोलीस निरीक्षक आमगाव व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य हनवत वट्टी, पंचायत समिति सदस्य राजेंद्र गौतम (कार्यरत सभापति) यानी उपोषण कर्त्याच्या मागण्या ऐकून घेत आश्वासन देत म्हटले की, तुमच्या मागण्यांवर त्वरित विचार करून ग्रामसेवक व सरपंचावर योग्य कार्यवाही करण्यात येईल. ह्या प्रकारची सांगता करून लिंबू पाणी पाजून उपोषण मागे घेण्यास प्रवृत्त केले. पण सदर प्रकरण दीड वर्षा पासुन शासनाच्या कार्यालयात धूळ खात पडून आहे. शासनाचे अधिकारी अशा गंभीर विषयावर कोणत्याही प्रकारचा विचार नकरता कर्मचाऱ्यांना सुट देतात. व गरिबाच्या रक्ताचा पाणी करतात. जर भ्रष्टाचारी अधिकारीवर योग्य कार्यवाही नझाल्यास जनता न्याय मागण्या करीता कुणाच्या दारी जाणार असा प्रश्न पडला आहे. जर सात दिवसात ह्या गंभीर प्रकरणावर ज्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून योग्य निर्णय नदेल्यास त्यांच्या विरुध्द तक्रार. मा. जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे केली जाणार असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
الاشتراك في:
تعليقات الرسالة (Atom)
अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द
धानाच्या बोनस आणि चुकार्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल
धानाच्या बोनस आणि चुकार्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...
-
आमगाव पोलिसांचे शानदार यश - बेकायदेशीरपणे दारू तस्करी करताना ३५ पेट्या आणि वाहन जप्त! शहरातील जगनाडे चौकात कारवाई 🖋️ मनोज भालेकर प्रतिनिधी...
-
PM-ABHIM योजनेअंतर्गत सुरु झालेला महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प, गोंदिया जिल्ह्याच्या नागरिकांसाठी ठरणार संजीवनी गोंदिया:- जिल्ह्यात आज ५०...
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق