मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने
الأربعاء، 8 فبراير 2023
الأربعاء، 18 يناير 2023
الأربعاء، 30 نوفمبر 2022
الخميس، 24 نوفمبر 2022
الثلاثاء، 8 نوفمبر 2022
الأحد، 6 نوفمبر 2022
الجمعة، 21 أكتوبر 2022
الخميس، 20 أكتوبر 2022
الخميس، 6 أكتوبر 2022
हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे नवरात्रीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या मातृशक्ती सन्मान सोहळ्यात पोलीस दलातील नारीशक्तींचा सन्मान
मलकापूर प्रतिनिधी
मातृशक्तीच्या उपासनेचे पर्व म्हणजेच नवरात्रोत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जात आहे.या पर्वामध्ये नारीशक्तीचे पूजन करून उपासना करण्यात येते. भारतीय संस्कृतीच्या उदय कालापासूनच मातृ शक्तीचे किती अगाध व मोठे स्थान आपल्याला लाभलेले आहे हे या उत्सवा मधून प्रतीत होत असते. म्हणूनच हिंदी मराठी पत्रकार संघ मलकापूर नेहमी सामाजिक कार्याला केंद्रबिंदू मानून त्यानुसार कार्यरत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून नवरात्रोत्सवानिमित्त या मातृशक्तींचे, नारीशक्तींचे सन्मान रुपी पूजन व्हावे म्हणून विविध क्षेत्रात आपले कार्यरुपी योगदान देणाऱ्या नारीशक्तींचा सन्मान गत सप्ताहभरात सुरू असून आज दि. 1/10/2022 रोजी जनतेच्या रक्षणासाठी म्हणजेच "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" या ब्रीद वाक्याच्या पदपथावर कार्यरत असणाऱ्या म्हणजेच पोलीस दलामध्ये सेवा देणाऱ्या नारीशक्तींचा हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर यांच्याकडून मलकापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या पीएसआय स्मिता म्हसाय मॅडम व पोलीस कॉ.श्रीमती वाढेमॅडम यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देत सन्मान रुपी सत्कार करण्यात आला.
यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर, विदर्भ सचिव सतिष दांडगे,जिल्हाध्यक्ष गौरव खरे, महासचिव करण सिंग, तालुका संपर्क प्रमुख धर्मेशसिंह राजपूत,शहर संघटक योगेश सोनवणे, प्रा.प्रकाश थाटे,प्रमोद हिवराळे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.
अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द
धानाच्या बोनस आणि चुकार्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल
धानाच्या बोनस आणि चुकार्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...
-
आमगाव पोलिसांचे शानदार यश - बेकायदेशीरपणे दारू तस्करी करताना ३५ पेट्या आणि वाहन जप्त! शहरातील जगनाडे चौकात कारवाई 🖋️ मनोज भालेकर प्रतिनिधी...
-
PM-ABHIM योजनेअंतर्गत सुरु झालेला महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प, गोंदिया जिल्ह्याच्या नागरिकांसाठी ठरणार संजीवनी गोंदिया:- जिल्ह्यात आज ५०...
